लग्नाच्या 'पहिल्या रात्री'विषयी बोलली, अभिनेत्रीवर बंदीची मागणी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नाच्या 'पहिल्या रात्री'विषयी बोलली, अभिनेत्रीवर बंदीची मागणी...
लग्नाच्या 'पहिल्या रात्री'विषयी बोलली, अभिनेत्रीवर बंदीची मागणी...

लग्नाच्या 'पहिल्या रात्री'विषयी बोलली, अभिनेत्रीवर बंदीची मागणी...

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - वादग्रस्त वक्तव्य करुन लक्ष वेधून घेणाऱ्या अभिनेत्रींची काही कमी नाही. अशाप्रकारे एखादं वक्तव्य करुन हजारो, लाखो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत लोकप्रियता मिळवणाऱ्या अभिनेत्रींची सध्या चलती आहे. दोन दिवसांपूर्वी बॉलीवूडच्या कंगनानं जे वक्तव्य केलं त्यावरुन देशभरातून तिच्यावर टीकेची झोड उठलीय. तिनं देशाच्या स्वातंत्र्यावरुन जे वक्तव्य केलं त्यावरुन तिला बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी टोकले आहे. तिच्या त्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आता दक्षिणेकड़ील एक अभिनेत्री तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

अभिनेत्री रचिता रामला डिंपल क्वीन या नावानं देखील ओळखलं जातं. ती गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिनं लग्नाच्या पहिल्या रात्रीच्या वेळच्या प्रसंगांचा केलेला उल्लेख. यामुळे चक्क तिच्यावर बंदी घालण्यात यावी. अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. सध्या ती तिच्या लव यु रच्चुच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यावेळी तिनं जे काही सांगितलं ते धक्कादायक होतं. कन्नड क्रांती दलानं तिच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी यापुढील काळात कर्नाटक सरकारनं रचिताच्या चित्रपटांवर कारवाई करावी अशी मागणी दलानं केली आहे.

एका पत्रकार परिषदेमध्ये रचिताला एक प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी तिनं लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल प्रतिक्रिया दिलीय. त्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. लव यु रच्चुशी संबंधित तिला एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामध्ये तिनं माझ्या कथेची जी डिमांड होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केला. त्यातून कुणाच्या भावना मला दुखवायच्या नव्हत्या. असं तिनं सांगितल.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: 'शिवसेना भाजप एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही'; विक्रम गोखले

loading image
go to top