esakal | कपिल आणि सुनिलची 'दिलजमाई' या हिरोने केली मध्यस्ती
sakal

बोलून बातमी शोधा

Kapil Sharma

हिंदीमधील लोकप्रिय कॅामेडी शो म्हणून ओळखला जाणारा 'द कपिल शर्मा शो' ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. 2013 मध्ये सुरू झालेल्या या शोने प्रेक्षकांना खळखळून हसवले  आहे. हा शो काही दिवस बंद असल्याने या शोचे चाहते शो पुन्हा कधी सुरु होणार याची वाट बघत आहेत.

कपिल आणि सुनिलची 'दिलजमाई' या हिरोने केली मध्यस्ती

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - हिंदीमधील लोकप्रिय कॅामेडी शो म्हणून ओळखला जाणारा 'द कपिल शर्मा शो' ने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. 2013 मध्ये सुरू झालेल्या या शोने प्रेक्षकांना खळखळून हसवले  आहे. हा शो काही दिवस बंद असल्याने या शोचे चाहते शो पुन्हा कधी सुरु होणार याची वाट बघत आहेत. 31 जानेवारीला हा शो बंद झाला. दुसऱ्यांदा बाबा झााल्याने कपिलने या शोमधून थोडे दिवस ब्रेक घेतला होतो. 

आता कपिल शर्मा शोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोष्ट घडणार आहे. जुलैमध्ये हा शो पुन्हा सुरू होणार आहे. नव्या रूपात हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे द कपिल शर्मा शोमध्ये कपिलचा जुना सहकारी आणि लोकप्रिय कलाकार सुनिल ग्रोवरची पुन्हा एन्ट्री होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

द कपिल शर्मा शो च्या नव्या सिझनमध्ये सुनिल दिसणार आहे. सुनिलने कपिलसोबत झालेल्या वादामुळे हा शो सोडला होता असे म्हटले जात होते. याआधीही सुनिल पुन्हा या शोमध्ये येणार अशी चर्चा होती पण असे झाले नाही. मात्र यावेळी बॅालिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणाऱ्या सलमान खानने या दोघांमधील मतभेद दूर केले आहेत.

संजय जाधव यांची नवी शाळा; 'फिल्मॅजिक' मध्ये घडणार नवे विद्यार्थी

सलमान खान हा कपिल शर्मा शोचा निर्माता आहे. त्यामुळे या कार्यक्रमात सुनिल आणि कपिलची जोडी एकत्र यावी असे सलमानला वाटत होते. शेवटी सलमानने मध्यस्ती करून या दोघांना एकत्र आणले. काही दिवसांपूर्वी कपिल शर्माच्या मेकअप आर्टिस्टनं सुनिल ग्रोवरसोबतचा एक फोटो शेअर केला होता. आता जुलैमध्ये शोची सुरूवात झाल्यावर सुनिल ग्रोवर या शोमध्ये परत येणार आहे. किकू शार्दा,कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर आणि कपिल शर्मा अशी स्टार कास्ट या शोची होती. यात आता सुनिल ग्रोवरचे नाव पुन्हा जोडले जाणार आहे. या शोचे परीक्षण आधी नवज्योत सिंग सिद्धू करत होते त्यानंतर त्यांची जागा अर्चना पुरण सिंग यांनी घेतली.

दादासाहेब फाळके पुण्यतिथी; इंग्लंड गाठलं, कॅमेरा घेऊनच भारतात आले 

Edited By - Prashant Patil