
Kareena Kapoor Celebrates Holi : तैमूर आणि जेह सोबत करिनाने उधळले रंग...
आज संपूर्ण देशात धुलिवंदन उत्सव साजरा करण्यात येत आहे. अनेक कलाकारांनी देखील रंग उधळले. अनन्या पांडेपासून ते शिल्पा शेट्टीपर्यंत अनेक सेलिब्रिटी हा रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. याप्रसंगी करीना कपूरने तिची मुले तैमूर आणि जहांगीर सोबत रंग उधळले. करीनाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.
करीना कपूर खानने तैमूर अली खान आणि जेह यांच्यासोबत धुलिवंदनाचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये करीना जेह आणि तैमूर सर्व भिजलेले आहेत. त्यांनी घराच्या टेरेसवर धुलिवंदन साजरे केले. हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर करीनाने धुलिवंदनाच्या शुभेच्छा देखी दिल्या आहेत.
हे फोटो शेअर करताना. करीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, "मिस यू सैफू, आम्ही सर्वांसाठी रंग, प्रेम आणि आनंद पसरवत आहोत. इंस्टा फॅमिली खूप प्रेम! होळीच्या शुभेच्छा."
चाहते देखील करीनाला शुभेच्छा देत आहेत. करिनाची योगा ट्रेनर अंशुका परवानी यांनीही बेबोसोबत होळीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. पहिल्यामध्ये तैमूर अली खान त्याची आई करीनाच्या चेहऱ्यावर रंग लावताना दिसत आहे. आणखी एका सेल्फीमध्ये करीना अंशुकासोबत पोज देताना दिसत आहे.