Video: योगा व्हिडीओत असं काय दिसलं की करिना कपूर होतेय ट्रोल,लोक म्हणू लागलेयत.. Kareena Kapoor khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kareena Kapoor Khan Yoga Video Gets hate Comments

Video: योगा व्हिडीओत असं काय दिसलं की करिना कपूर होतेय ट्रोल,लोक म्हणू लागलेयत..

Kareena Kapoor Khan: करीना कपूर खान बॉलीवूड फॅशन आयकॉन आहेच शिवाय वयाच्या चाळीशीनंतरही एक फीट अभिनेत्री आहे. करिना आपल्या फीटनेसची जरा जास्तच काळजी घेताना दिसते. सर्वसामान्य चाहतेच नाहीत तर बॉलीवूडचे कितीतरी सेलिब्रिटी करिनाच्या फिटनेसचे आणि सौंदर्याचे दिवाने आहेत. आता नुकताच करिनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे,ज्यात ती योगा करताना दिसत आहे. या व्हिडीओला करिनाच्या योगा प्रशिक्षकानं शेअर केलं आहे. व्हिडीओला पाहिल्यानंतर एकीकडे जिथे करिनाचे चाहते तिची प्रशंसा करताना थकत नाहीयत तिथे दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल(Troll) करायला सुरुवात केली आहे. ट्रोलर्स करिनाविषयी अगदी काहीही उलट-सुलट बोलताना दिसत आहेत.(Kareena Kapoor Khan Yoga Video Gets hate Comments)

हेही वाचा: 'एखादा सिनेमा चालत नाही याचा अर्थ...', बॉयकॉट ट्रेन्डवर रणबीर स्पष्टच बोलला

कोणी तिला आंटी बोलत आहे तर कुणी म्हणतंय, म्हातारपणात फक्त योगा करुन काही नाही होत. तर कुणी तिला 'बुड्ढी बेबो' म्हणून संबोधलं आहे. अर्थात यामुळे आता सोशल मीडियावर करिनाचे चाहते विरोधात ट्रोलर्स अशी खडाजंगी सुरू आहे. तिचे चाहते म्हणतायत,'वयाच्या चाळीशीत इतकं सुंदर राहणं आणि फिट दिसणं तेही इतक्या व्यस्त शेड्युलमधून...कोणालाही सहज शक्य होत नाही ते करिना करुन दाखवतेय'.

हेही वाचा: 'त्यानंतर अबू सलेम शाहरुखला सारखे फोन करायचा, खंडणीसाठी नाही तर...' वाचा सविस्तर

तसंही करिना कपूरला ट्रोलिंगमुळे काहीच फरक पडत नाही. ती कितीतरी वेळेला ट्रोलिंगची शिकार झाली आहे. आणि तिनं म्हटलं देखील आहे की ती नकारात्मक गोष्टींकडे ढुंकूनही लक्ष देत नाही.

हेही वाचा: घर चालवणं कठीण झालं तेव्हा मनावर दगड ठेवून आशा भोसलेंनी घेतलेला मोठा निर्णय...

करिनाचा 'लाल सिंग चड्ढा' सिनेमा गेल्याच महिन्यात प्रदर्शित झाला होता. तिच्यासोबत या सिनेमात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. हा सिनेमा हॉलीवूडच्या 'फॉरेस्ट गम्प' सिनेमाचा रीमेक होता. बॉयकॉट ट्रेन्डचा या सिनेमाला मोठा फटका बसला आणि तो बॉक्सऑफिसवर दणकून आपटला. आता करिना सुजॉय घोषच्या 'द सस्पेक्ट ऑफ डिव्होशन एक्स' मध्ये दिसणार आहे. सिनेमात तिच्यासोबत विजय वर्मा आणि जयदीप अहलावत असणार आहेत.

हंसल मेहताच्या सिनेमातही करिना काम करत आहे. या सिनेमाचं टायटल अद्याप निश्चित व्हायचं आहे. पण बोललं जात आहे की या सिनेमाच्या माध्यमातून करिना निर्माती म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे. तिची निर्माती म्हणून नवी इनिंग सुरु होत आहे. तिच्या प्रॉडक्शनचे नाव मेडन प्रॉडक्शन असे आहे.

Web Title: Kareena Kapoor Khan Yoga Video Gets Hate

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..