Ranbir-Alia Wedding: कतरिनाने दिल्या रणबीर-आलियाला शुभेच्छा! म्हणाली...

कतरिना कैफने इंस्टाग्रामवरून रणबीर आलियाच्या लग्नाचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.
Katrina Kaif Congratulates Alia-Ranbir
Katrina Kaif Congratulates Alia-Ranbir Sakal

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न कधी होणार याकडे लाखो चाहत्यांचे लक्ष लागून राहिले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा बॉलीवूडमध्ये सुरु होत्या. परंतु त्यांचं लग्न नेमकं कधी होणार हे स्पष्ट होत नव्हते.... परंतु काल हे दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत. अगदी निवडक लोकांच्या उपस्थिती हा विवाहसोहळा पार पडला. दरम्यान कतरिना कैफने इंस्टाग्रामवरून रणबीर आलियाच्या लग्नाचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. "तुम्हा दोघांचं अभिनंदन"असं कतरिनानं म्हटलं आहे. (Katrina Kaif Congratulates Alia-Ranbir for their wedding)

Katrina Kaif Congratulates Alia-Ranbir
नांदा सौख्य भरे! आलिया-रणबीरच्या लग्नाचे खास फोटो

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर पूर्वी नात्यात होते. ते दोघंही लग्न करणार असल्याची चर्चाही बॉलीवूडमध्ये रंगत होती. रणबीरच्या घरी कतरिनाचं येणं-जाणंही होतं. परंतु या चर्चांना पूर्णविराम मिळाला. दरम्यान काहीच दिवसांपूर्वी कतरिनाने विकी कौशलशी विवाह केला आणि आता रणबीर-आलिया यांचाही काल विवाह झाला. त्यानंतर कतरिनाने इंस्टाग्रामवरून आलिया आणि रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत.

Katrina Kaif Congratulates Alia-Ranbir
शुभमंगल सावधान! रणबीर आलियाच्या लग्नाचे खास क्षण,पहा फोटो...

गेल्या काही दिवसांपासून ज्या लग्नाची चर्चा होती ते आलिया (Alia Bhatt)-रणबीरचं (Ranbir Kapoor) लग्ना अखेर पार पडलं. आपले हे आवडते स्टार्स लग्नात कसे दिसत असतील याची प्रतिक्षा अखेर संपली. दोघांचे लग्नातले फोटो अखेर झपाट्यानं सोशल मीडियावर व्हायरल झाले. पांढऱ्या आणि गोल्डन रंगाचं कॉम्बिनेशन असलेला लेहेंगा,गळ्यात मोगऱ्याचा हार अन् भरजरी ज्वेलरी यात आलिया नव्या नवरीच्या रुपात शोभून दिसतेय. तर रणबीरही याच कॉम्बिनेशनच्या पेहरावात राजबिंडा दिसत आहे, लग्नाचं तेज आणि सुख दोघांच्याही चेहऱ्यावर झळकताना दिसलं,. आलियानं स्वतः आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक खास मेसेज शेअर करीत लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com