
बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे विकी कौशल आणि कतरिना कैफ हे नेहमीच चर्चत असतात. हे जोडपं नेहमीचं असं काही करत की नेटकऱ्यांना त्याचं कौतुक करावचं लागतं. विकी आणि कतरिना नेहमी त्यांच्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून एकमेकांसोबत दिसतात.
त्याचबरोबर ते आपल्या कुटुंबासोबतही दिसतात. कतरिना कैफ अनेकदा तिच्या सासूसोबत परंपरा आणि सण उत्सव साजरा करतांना दिसते. (Katrina Kaif visited the Siddhivinayak temple in Mumbai Friday morning)
मग ते दिवाळी असो किंवा करवाचौथ नाहितर ख्रिसमसचं सेलिब्रेशन करतरिना एक उत्तम सून असल्याचे दाखले देत असते. अलीकडेचं, कतरिना कैफ पती विकी कौशल आणि सासूसोबत सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली आहे.
सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो खूप व्हायरल होत आहेत. काही यूजर्सने हे फोटो पोस्ट केले. चित्रात विकी, कतरिना आणि तिची सासू बाप्पाचे आशीर्वाद घेतांना दिसत आहेत. जिथे विकीच्या हातात प्रसादची टोपली दिसते. तर कतरिना देवासमोर हात जोडून उभी आहे. या जोडप्याच्या मागे भाविकांची मोठी गर्दीही पाहायला मिळते.
तर दुसऱ्या चित्रात पंडित कतरिना आणि विकीला बाप्पाचा फोटो देताना दिसत आहेत. कतरिना हिंदू धर्माचं प्रत्येक कर्तव्य पार पाडत असल्याचं चित्रात दिसून येतं. तिने डोक्यावर ओठणी घेतली आहे. हे फोटो पाहिल्यानंतर या कपलचे चाहते खूपच खूश आहेत.
सोशल मीडिया यूजर्सचे म्हणणे आहे की लग्नानंतर कतरिना कैफ पूर्णपणे विक्की कौशलच्या रंगात रंगली आहे. पंजाबी सून होण्याचे प्रत्येक कर्तव्य ती पार पाडतानाही दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.