तो केरळचा पण मराठी; केदार शिंदेने सांगितल्या जयराज मामांच्या खास आठवणी..

अनेक मराठी नाटकं, मालिका, चित्रपट रंगवलेला दिग्गज अभिनेता म्हणजे जयराज नायर. ते कायमच प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्याच जयराज नायर यांच्या विषयी केदार शिंदे म्हणतात...
kedar shinde posted on jayraj nair
kedar shinde posted on jayraj nairsakal

Entertainment news : दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) यांनी आजवर रंगभूमीवर भरीव योगदान दिले आहे. त्यांची नाटकं असो किंवा चित्रपट, प्रेक्षक भान हरपून त्यात समरस होतो. आजोबा शाहीर साबळे यांच्याकडून आलेला लोककलेचा वारसाही त्यांनी जपला आहे. शाहीर साबळे यांचे जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' (maharashtra shahir) हा त्यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षक भेटीला येणार आहे. केदार शिंदेंकडे अनुभवांचा खजीना आहे. त्यांच्याशी गप्पा करताना ते अनेक किस्से रंगवत असतात. लोककला. नाटक, चित्रपट आणि मैत्रीचे त्यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. आज केदार यांनी चक्क एका कलाकाराविषयीची आठवण सांगितली आहे.

kedar shinde posted on jayraj nair
Ranbir-Alia Fere Ceremony:रणबीर-आलियाच्या फेऱ्यांत नटून-थटून पोहोचले वऱ्हाडी

हा कलाकार म्हणजे जयराज नायर. अनेक मराठी नाटकं, मालिका, चित्रपट रंगवलेला हा अभिनेता कायमच प्रसिद्धीपासून दूर राहिला. त्यांचाच गौरव करणारी ही पोस्ट म्हणावी लागेल. या पोस्ट मध्ये केदार यांनी जयराज नायर यांचा नाटकाचा प्रवास कलेविषयीची धडपड आणि आणि आयुष्यातील काही कठीण प्रसंगांचे वर्णन केले आहे. ते करताना माणूस म्हणून जयराज नायर किती समृद्ध आहेत, याचा देखील उल्लेख यांच्या पोस्ट मध्ये आला आहे.

kedar shinde posted on jayraj nair
पाहा रणबीर आलियाच्या लग्नाचा अल्बम, कोण आहेत वऱ्हाडी ? कसा होता थाट?

केदार शिंदे लिहितात... 'जयराज नायर.. हा एक मराठी माणूस आहे. तसा तो केरळचा! पण मी त्याला भेटलो तेव्हा मी ३ वर्षांचा असेन. शाहीर साबळे आणि पार्टी मध्ये हौशी कलाकार म्हणून त्याची एन्ट्री झाली. पुढे प्रत्येक बाबांच्या मुक्तनाट्यात त्याचा सहभाग होता. ठाण्याच्या गरवारे कंपनीची नोकरी सांभाळून तो त्याचा कलेचा प्रवास करत होता. माझं कळतं वय झालं तोवर तो आमच्या घराचा मेंबर झाला होता. मी जयराज मामा म्हणतो त्याला. अजुनही!'

'पुढे आम्ही महाराष्ट्राची लोकधारा मधे सहभागी झालो तेव्हा तो आम्हाला सांभाळून घ्यायला होता. तो केरळचा असूनही अस्खलित मराठी बोलतो याचं अप्रूप वाटायचं. पण कालांतराने तो मामा म्हणूनच जवळचा झाला आणि आडनाव मिटलच... आम्ही लोकधारा करतानाच एकांकिका करण्याच्या भुताने आम्हाला झपाटलं. आमची धडपड पाहून त्याने सुध्दा आमच्यात सामील व्हायची इच्छा व्यक्त केली. खरतर वयाने तो खुप मोठा तरीही कुठलाही आडपडदा न ठेवता तो आमच्या गॅंग मधे सहभागी झाला. हळूहळू मी व्यावसायिक रंगभूमीवर धडपड करत असतानाच त्याची कंपनी सुटली. गरवारे बंद झाली आणि तो हतबल झाला. त्याची दोन मुलं तेव्हा शाळेत होती. त्यावेळी मी श्रीमंत दामोदर पंत नाटक लिहीत होतो. त्याने भुमिका करण्याची इच्छा व्यक्त केली पण त्यात त्याला साजेसा रोल नव्हताच. श्रुंगारपुरे हे कॅरेक्टर एका सीन साठी येत होतं. त्याला त्यासाठी कसं विचारायचं? पण त्याने मोठेपणाने ती भुमिका स्वीकारली. आजही घराघरात तो त्याच कॅरेक्टरच्या नावाने प्रसिद्ध आहे,' अशी आठवण केदार शिंदे यांनी सांगिलती आहे.

पुढे ते म्हणतात, 'सही रे सही करताना दत्तू बेवडा हे कॅरेक्टर मी खास जयराज मामासाठी लिहीलं. ते त्याने इमानदारीने सादर केलं. अगदी २२ वर्ष न थकता न कंटाळता तो भरत सोबत उभा आहे. आमच्या डोळ्यासमोर त्याची आणि विजय चव्हाण यांची दोस्ती आहे. आज जयराज मामा तृप्त आहे. समाधानी आहे. तो आणि मामी यांनी आपल्या मुलांना शिकवलं. वाढवलं. संस्कार दिले. आज दोन्ही मुलं परदेशात सेटलआहेत. आणि जयराज मामा रिटायर्ड न होता त्याचा कलेचा प्रवास करत आहे. हा जो फोटो आहे, तो खास आम्ही तिघांनी त्याला विनंती करून काढला आहे. कारण आमच्या या प्रवासात तो नसता तर आम्ही इथवर नक्कीच पोहोचलो नसतो.' असे भावना केदार शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे आज जयराज नायर यांचा वाढदिवस असल्याने हि खास पोस्ट केदार शिंदे यांनी लिहिली आहे. 'जयराज मामा वाढदिवस शुभेच्छा...' अशा शब्दात केदार यांनी मामांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com