
Ketan Mehta On Kangana Ranaut: प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकांमध्ये केतन मेहता यांचे नाव आवर्जून घेतले जाते. ते सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहेत. केतनने भवई ,होली, मिर्च मसाला यांसारखे हिट सिनेमे बॉलिवूडला दिले.
त्याने आमिर खान सोबत क्रांतिकारी मंगल पांडेचा बायोपिकही बनवला. जो आजही तितकाच हिट आहे. केतन आणि कंगना याच्यातील वाद हा सर्वश्रुत आहे. दोघेही कोणत्या ना कोणत्या कारणाने एकमेकांवर टिका करण्याची संधी सोडत नाहीत. मात्र गेले काही दिवस हे दोघेही शांत होते.
आता बऱ्याच दिवसांनंतर केतनने पुन्हा एकदा कंगनावर जहरी टिका करत तिनं त्याचा प्रोजक्ट चोरल्याचा आरोप केला आहे. तिच्या 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटावर भाष्य करत या चित्रपटाला अराजकतावादी म्हटलं आहे.
केतन आणि कंगना याआधी लक्ष्मीबाईंवर आधारित 'क्वीन ऑफ झांसी' नावाचा चित्रपट बनवणार होते. मात्र त्यांनतर कंगनाने दक्षिण भारतीय दिग्दर्शक क्रिशसोबत 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' हा चित्रपट बनवण्याची घोषणा केली. त्यामुळेच केतन आणि कंगना यांच्यात दुरावा वाढला आणि दोघेही आता एकमेंकांच्या विरुद्ध आहेत.
एका मुलाखतीत चित्रपटाबद्दल बोलताना चित्रपट निर्मात्याने सांगितले की, 'चित्रपटाची संपूर्ण स्क्रिप्ट तयार होती मात्र चित्रपट तयार करण्यात आला तेवाह ती पुर्णपणे बदल्यात आली. माझी कल्पना ब्रिटीश सेनापतींच्या झाशीची राणी ताब्यात घेण्याच्या ध्यासाची होती. मी चित्रपटातून बाहेर पडताच कंगनाने संपूर्ण चित्रपटाची रूपरेषाच बदलून टाकली.'
केतन म्हणाला की कंगनाने केवळ त्याचा विश्वासच तोडला नाही तर चाहत्यांनाही नाराज केले आहे. कंगनाने फक्त तिचाच मनमानी कारभार केला. जे केले ते खूपच दयनीय होते. मणिकर्णिका झाशीची राणी अराजकतावादी आणि राष्ट्रवादी बनला. तो म्हणाला की, 'कंगनाने माझा प्रोजेक्ट चोरला आहे ज्यावर मी 10 वर्षांपेक्षा जास्त काळ काम केले आहे.'
केतनने 2016 मध्ये राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपटाची घोषणा केली होती ज्यात कंगनाची निवड ही मुख्य भुमिकेसाठी करण्यात आली होती. पण नंतरच्या काळात कंगनाने 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' हा चित्रपट बनवला आणि मेहता यांचा त्यात सहभाग नव्हता. यानंतर केतनने कंगना आणि चित्रपटाच्या निर्मात्यावर विश्वास भंगाचा आरोप करत खटला दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.