
'या' प्रसिद्ध सेलिब्रिटीचा Sex Video आईनंच केलेला Leak; 14 वर्षांनी खुलासा
किम कर्दाशियां(Kim Kardashian) एकदा पुन्हा आपल्या सेक्स व्हिडीओला घेऊन चर्चेत आहे. खरंतर काही वर्षांपूर्वी किमचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या या प्रकरणावर किमच्या एक्स बॉयफ्रेंडनं धक्कादायक खुलासा केला आहे. या प्रकरणावर मौन सोडत तो म्हणाला आहे, ''मी कधीच किमच्या सेक्स व्हिडीओला लीक केलं नाही. उलट किमच्या आईचाच यात हात आहे. माझं किम आणि तिची आई क्रिस जेनरसोबत यासंदर्भात डील झालं होतं''. या गोष्टीचा खुलासा स्वतः किमनं एका शो मध्ये केला होता. त्यावेळी तिला अश्रू अनावर झाले होते. गेल्या आठवड्यात किम कर्दाशियाला आपल्या नवीन रिअॅलिटी शो मध्ये या सेक्स व्हिडीओसंदर्भात बोलताना रडलेलं सगळ्यांनीच पाहिलं. गेल्या वर्षी शूट झालेल्या या एपिसोडमध्ये किमनं आपला नवरा कान्ये वेस्टकडे हा सेक्स व्हिडीओ गेला होता हे सांगितलं होतं. हे सांगताना किम भावूक झाली होती.

Kim Kardashian sex tape secret
एका मुलाखतीत बोलताना किमचा एक्स बॉयफ्रेंड जे म्हणाला की,''त्याच्याकडे किमसोबत बनवलेल्या त्या सेक्स व्हिडीओची दुसरी कॉपी नव्हती. मी १४ वर्षांपासून सत्यापासून लांब राहिलो आणि कर्दाशिया कुटुंबाने माझ्या नावाचा दुरुपयोग केला. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी माझ्या नावावर कितीतरी अरब डॉलरची कमाई केली आहे. मी याआधी यावर कधील बोललो नव्हतो. मी कोणताच सेक्स व्हिडीओ लीक केला नाही. मी माझ्या संबंध आयुष्यात असं कधीच केलं नाही''. रे जे म्हणाला,''सेक्स व्हिडीओला पोस्ट करण्याची कल्पना माझी होती. मीच किमला हे सुचवलं होतं. त्यानंतर किमनं आपली आई क्रिस जेनरला हे सांगितलं. आणि क्रिसने विविड एंटरटेनमेंट च्या बॅनर अंतर्गत सेक्स व्हिडीओला रिलीज करण्याचं ठरवलं. किम आणि मी अशा तीन व्हिडीओचं कॉन्ट्रॅक्ट साइन केलं होतं''.
हेही वाचा: हॉलिवूडचे डार्क सीक्रेट्स: कुणाला आंघोळीचा कंटाळा तर कुणाचे वडील होते चोर
रे ने सांगितल्याप्रमाणे त्याने तीन व्हिडीओ शूट केले होते. यातील एक व्हिडीओ रिलीज करण्यात आला होता. तो म्हणाला,''माझ्या घरी एकही व्हिडीओची डबल कॉपी नव्हती. किमच्याच घरी सगळे व्हिडीओ होते. तिनं नाइकीच्या शूजच्या बॉक्समध्ये ते ठेवून पलंगामध्ये त्याला लपवलं होतं'. रे पुढे म्हणाला,'मला आत्महत्या कराविशी वाटत होती. कारण जेव्हा तुम्हाला कळतं की सत्य काय आहे आणि एखादं कुटुंब खोट्या गोष्टींच्या आधारावर,तुमचं नाव खराब करीत बक्कळ पैसा कमावतं तेव्हा खूप चीड येते'. किमचा पती कान्ये वेस्टला आपण कोणतीही टेप न दिल्याचं रे नं म्हटलं आहे. मी फक्त कान्येला एक डिव्हाइस दिलं होतं. ज्यामध्ये किमसोबतचे इंटिमेट फोटो आणि मिनी व्हिडीओ होते. आणि हे सगळं मी किम सोबत नात्यात असतानाच पाठवलं होतं. त्यामुळे फसवण्याचा काही प्रश्नच येत नाही''.
Web Title: Kim Kardashian Sex Tape
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..