Kiran Mane: आन् अफजलखान टर्रर्रर्रकन् फाटला.. महाराजांसाठी किरण माने यांची सळसळती पोस्ट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kiran Mane shared post about chhatrapati shivaji maharaj and ravrambha marathi movie

Kiran Mane: आन् अफजलखान टर्रर्रर्रकन् फाटला.. महाराजांसाठी किरण माने यांची सळसळती पोस्ट..

kiran mane in ravrambha movie: किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. ते आज मनोरंजन विश्वात भक्कम उभे असले तरी त्यामागे त्यांचा प्रचंड मोठा संघर्ष आहे. अनेक वर्षे मालिका, चित्रपट, नाटक करून त्यांनी नाव लौकिक मिळवला आहे.

किरण माने यांना बिग बॉस मराठी नंतर खऱ्या अर्थाने मोठी प्रसिद्धी मिळाली. सध्या त्यांचा फॅन क्लब जबरदस्त वाढला आहे. त्यामुळे किरण माने कधी नव्या प्रोजेक्ट मध्ये दिसणार याची चाहते वाट पाहत होते. नुकताच त्यांचा 'रावरंभा' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला तूफान प्रतिसाद मिळत आहे.

या चित्रपटात किरण माने 'हकीमचाचा' या भूमिकेत आहेत. किरण माने एक शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुयायी आहेत. ते कायमच महाराजांविषयी भरभरून बोलत असतात. आता या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा एक पोस्ट लिहिली आहे.

(Kiran Mane shared post about chhatrapati shivaji maharaj and ravrambha marathi movie)

किरण माने लिहितात की, ''छ. शिवराय रावजीला विचारतात, "टकमक टोकाची भिती नाही वाटली?" राव म्हणतो, "...'भिती' प्रतापगडाच्या पायथ्याशीच वाघनखात बदलली आन् अफजलखान टर्रर्रर्रकन् फाटला !"

''हे ऐकून थिएटरमध्ये प्रत्येकाच्या अंगातलं रक्त दुप्पट वेगानं सळसळतं... छाती अभिमानानं भरून येती. परवापासून 'रावरंभा'चे महाराष्ट्रासह सातार्‍यातले सगळे शोज हाऊसफुल्ल चाललेत.''

''शेवटपर्यन्त लोक खुर्चीला खिळुन रहातात. स्वराज्याचं वेड प्रत्येक मावळ्याच्या अंगात कसं भिनलं होतं, हे 'रावरंभा'नं जितक्या प्रभावीपणे दाखवलंय तसं यापूर्वी कधीच दिसलं नव्हतंं. मुळात एका अनोळखी मावळ्यावर सिनेमा काढण्याचं धाडस कुणी केलं नाही.''

''राजधानी सातारच्या मातीतले निर्माते शशिकांत पवार, याच भूमीतले लेखक प्रताप गंगावणे आणि इथलंच पाणी प्यायलेले दिग्दर्शक अनुप जगदाळे या त्रिकुटानं हे स्वप्न बघितलं... धावता घोडा टकमक टोकावर दोन पायांवर उभा करावा, तशी हिम्मत दाखवत ते रूपेरी पडद्यावर साकार केलं !''

पुढे किरण माने यांनी लिहिलं आहे की, ''रावरंभाला दुसर्‍या आठवड्यातही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. राजधानी सातार्‍यात तर सगळे रेकाॅर्डस् तुटण्याची चिन्हं आहेत. लै भारी वाटतंय.''

''सिनेमा येण्याआधी आमच्याच क्षेत्रातला एक मोठा दिग्दर्शक मला म्हणाला होता, "आजकाल मराठी सिनेमाची एवढी वाईट अवस्था असताना, हा भव्यदिव्य डोलारा उभारण्याची तुमच्या निर्माता दिग्दर्शकाला भिती नाही वाटली???"

''...त्यावेळी त्याला मी तेच उत्तर दिलं होतं, जे रावनं छत्रपतींना दिलंवतं ! त्याला हे ही सांगीतलं की स्वराज्याच्या राजधानीतच 'भिती'चा कोथळा बाहेर निघालाय... निडरपणे झुंजणं हे आमच्या राजानं आमच्या रक्तात भिनवलेलं हाय !'' अशा शब्दात किरण माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.