KRK : रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच केआरके तुरुंगात; जामीन मिळेल का?

केआरकेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
kamal rashid khan Latest News
kamal rashid khan Latest Newskamal rashid khan Latest News

kamal rashid khan Latest News अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खान उर्फ ​​केआरकेला (KRK) वादग्रस्त ट्विट केल्यामुळे मुंबई पोलिसांनी विमानतळावरून अटक केली होती. अटकेनंतर त्याला बोरिवली दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, केआरकेच्या छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात (Hospital) नेण्यात आले. आता तेथून त्याला आर्थर रोड कारागृहात हलवण्यात आले आहे.

कमाल रशीद खानचा जामीन अर्ज यापूर्वी दाखल केला होता. त्यावर २ सप्टेंबर रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. केआरकेला १ सप्टेंबरच्या रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. तेथून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. केआरकेवर कोणताही गुन्हा दाखल होऊ शकत नाही. माझे वैयक्तिक मत मांडले तर त्यात गैर काहीच नाही, असे कमाल रशीद खानचे वकील अशोक सारागोई यांनी सांगितले.

kamal rashid khan Latest News
VIRAL VIDEO : शाहरुखचा मुलगा अबरामने घेतले लालबागचा राजाचे दर्शन

ज्या आर्थर रोड जेलमध्ये केआरकेला हलवण्यात आले आहे तिथे इंदर कुमार, सूरज पांचोली, शायनी आहुजा, सलमान खान, संजय दत्त, राज कुंद्रा, आर्यन खानने शिक्षा भोगली आहे. ​​कमाल रशीद खानला (KRK) सोमवारी (ता. २९) रात्री उशिरा मुंबई विमानतळावरून मालाड पोलिसांनी अटक केली होती.

२०२० मध्ये अक्षय कुमारच्या लक्ष्मी बॉम्बविरोधात आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप त्याच्यावर होता. यानंतर सोशल मीडियावर बदनामी आणि दोन गटांमध्ये भांडण लावल्याप्रकरणी आयपीसीच्या कलम ५०० आणि १५३A अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आयटी कायद्याचे कलम ६७ अ लावण्यात आली.

kamal rashid khan Latest News
बेबी बंपमुळे बिपाशा बसू झाली ट्रोल; संतापून म्हणाली, ते आमच्या बाळाचे घर...

केआरकेने अक्षय कुमार आणि लक्ष्मी बॉम्बच्या निर्मात्यावर वादग्रस्त ट्विट केले होते. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, केआरकेविरोधात लूक आऊट सर्क्युलरही जारी केले होते. राष्ट्रीय महिला आयोगानेही महाराष्ट्र पोलिसांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. कारण, त्याने महिलांबद्दल असभ्य गोष्टीही बोलल्या होत्या. आता त्याला जामीन मिळतो की नाही हे पाहावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com