
लारा दत्ता करोनाबाधित...
गेल्या काही दिवसात मुंबईतून करोनाची लाट बऱयापैकी ओसरली आहे. त्यामुळे सतत कुणीतरी करून पॉसिटीव्ह येणे, इमारती सील होणे असले प्रकार कानावर येणे बंद झाले आहेत. हेच सेलिब्रीटींबाबत आहे. करोनाच्या दोन्ही लाटांमध्ये कलाकार करोना बाधित झाल्यास त्याचा मोठा गवगवा होत होता. गेल्या काही दिवसात सर्व कलाकार झाडून आपल्याला चित्रीकरणात व्यस्त आहेत. अशातच अभिनेत्री लारा दत्ता करोनाबाधित असल्याची बातमी समोर आली आहे.
हेही वाचा: द कपिल शर्मा शो होणार बंद? शो बंद होण्याला कपिलच आहे कारणीभूत
लारा दत्ता हीला करोना संसर्ग झाला असून मुंबई पालिका अधिकाऱ्यांनी तिचे घर सील केले आहे तसेच त्यांचा राहता परिसर 'मायक्रो कंटेनमेंट झोन' म्हणून घोषित केला आहे.
हेही वाचा: ''हे तर दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे लोक'', विवेक अग्निहोत्री संतापले
हे दृश्य कलाकारांच्या आयुष्याचा घटक बनलेल्या पापाराझी ला दिसले. तिच्या घराबाहेर पालिकेचे फलक दिसताच त्याने ते छायाचित्र कैद करत लारा दत्ता यांना करोना झाल्याचे उघड केले. लारा दत्ता हिची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर नागरी संस्थेने शुक्रवारी तिची वांद्रे येथील जागा सील केली. तिच्या कुटुंबात केवळ तिलाच करोनाची बाधा झाल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
हेही वाचा: "काश्मीरी पंडितांची थट्टा करु नका"; अनुपम खेर केजरीवालांवर भडकले
अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम' मध्ये वाणी कपूर आणि हुमा कुरेशीसोबत लारा दत्ताने भूमिका साकारली होती. दरम्यान तिने डिजिटल प्लॅटफॉर्मवर 'हिचअप्स अँड हुकअप्स', 'हंड्रेड' आणि 'कौन बनेगी शिखरवती' अशा विविध वेब मालिकांमध्ये काम केले आहे.
Web Title: Lata Datta Covid 19 Corona
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..