लता दीदींना 18 दिग्गज भारतीय गायकांची 'संगीत श्रद्धांजली'

दिवंगत लता मंगेशकर, आजही त्यांच्या चाहत्यांमध्ये नाईटिंगेल ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जातात
Lata Mangeshkar
Lata Mangeshkar Google

Lata Mangeshkar: दिवंगत लता मंगेशकर, आजही त्यांच्या चाहत्यांमध्ये नाईटिंगेल ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जातात, त्यांनी 'भारताचा आवाज' म्हणून आपले स्थान निर्माण केले (Bollywood News) आहे. त्यांच्या आवाजाला प्रत्येक भारतीयाच्या हृदयात एक विशेष स्थान आहे आणि प्रत्येकाच्या मनात अमिट छाप सोडली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.(Entertainment News) या लोकप्रिय आवाजांना त्यांच्या 'नाम रह जायेगा' या खास मालिकेद्वारे संगीत उद्योगातील दिग्गज लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ एकत्र येत आहेत. भावना आणि नॉस्टॅल्जियाने भरलेल्या, या विशेष कार्यक्रमात, गायक त्यांच्या आठवणी आणि लताजींशी संबंधित किस्से शेअर करतील. या सांगीतिक वारशाला आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यासाठी, एक-दोन नव्हे तर तब्बल अठरा नामवंत गायक एकत्र येत आहेत.

या भव्य श्रद्धांजली कार्यक्रमात सोनू निगम, अरिजित सिंग, शंकर महादेवन, नितीन मुकेश, नीती मोहन, अलका याज्ञिक, साधना सरगम, प्यारेलाल जी, उदित नारायण, शान, कुमार सानू, अमित कुमार, जतिन पंडित, जावेद अली, ऐश्वर्या मजुमदार, स्नेहा पंत, पलक मुच्छल आणि अन्वेषा मंचावर एकत्र येत लता मंगेशकर यांची सर्वात प्रतिष्ठित गाणी गाऊन त्यांना श्रद्धांजली वाहतील. या कार्यक्रमात लता मंगेशकर यांचे कुटुंबीय देखील आपली विशेष उपस्थिती लावणार आहे.

shaan Singer
shaan Singer esakal
Lata Mangeshkar
Lata Mangeshkar: 'जयप्रभा स्टुडिओत लतादिदींचे स्मारक उभारु'

या कार्यक्रमाबद्दल बोलताना, भारतातील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक, शान म्हणतो,"या भव्य श्रद्धांजलीचा भाग बनणे हा मोठा सन्मान आहे. लताजी केवळ अशी व्यक्ती नाही ज्यांचा मी केवळ सन्मान करतो, परंतु त्यांचे प्रशंसा आणि प्रेम देखील करतो. ते असे व्यक्तीमत्व आहे ज्याच्याशी प्रत्येक भारतीय मनापासून जोडलेला आहे. मी याला माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक मानतो आणि अशा भव्य मंचावर देशातील या महान गायकाला श्रद्धांजली वाहण्याची संधी मला मिळाली हे मला अविश्वनीय वाटत आहे. मी स्वतःला खरोखर भाग्यवान समजतो."

Lata Mangeshkar
Salman Khan tribute lata Didi : लतादीदींच्या सारख कोणीच नव्हतं, ना कोणी होणार | Sakal Media |

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com