'तुमच्यामुळं झालंय हे'; सिद्धार्थ-मितालीची खास पोस्ट चर्चेत

सिद्धार्थने नुकताच एका नव्या पाहूण्याचा फोटो शेअर केला
mitali mayekar,siddharth chandekar
mitali mayekar,siddharth chandekarfile image

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असतो. त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकरसोबतचे फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर नेहमी शेअर करतो. नुकताच त्याने एका नव्या पाहूण्याचा फोटो शेअर केला. हा फोटो मिताली आणि सिद्धार्थ राहतात त्या बिल्डिंगमागे आलेल्या पाहूण्याचा आहे.(leopard spotted at backyard of mitali mayekar siddharth chandekar house)

काही दिवसांपुर्वी मुंबईमधील गोरेगाव येथे बिबट्या शिरल्याचं पाहायला मिळलं. मिताली आणि सिद्धार्थच्या बिल्डिंगमागे आलेल्या एका जखमी बिबट्याचा फोटो सिद्धार्थने शेअर केला. या फोटोला सिद्धार्थने कॅप्शन दिले, 'आमच्या बिल्डिंग च्या मागे आज एक पाहुणा आला होता. बराच वेळ आमच्याकडे टक लावून बघत बसला आणि झुडपात निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर एक जखम दिसली. "तुमच्यामुळे झालंय हे" असं नजरेतून सांगत होता. बिल्डिंग मधले सगळे फोटो काढायला खिडकीत आले. मी पण आलो. तो फक्त स्थिर नजरेनं बघत होता आमच्याकडे. त्याचा नजरेतून कळत होतं स्पष्ट की पाहुणा तो नाही, आम्ही आहोत. हे त्याचं घर आहे.'

mitali mayekar,siddharth chandekar
रितेशनं शेवटी जेनेलियापुढे हात जोडले....

सिद्धार्थच्या या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या. मितालीने सिद्धार्थच्या फोटोवर कमेंट करत केली, 'पाहुणा कोण? मी? की तुम्ही?'. काही दिवसांपुर्वी मितालीने घरामागील जागेत आलेल्या बिबट्याचा व्हिडिओ शेअर केला होता. सिद्धार्थ आणि मितालीने शेअर केलेल्या बिबट्याच्या फोटो आणि व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. सिद्धार्थने त्याच्या घरामागे आलेल्या सांबराचा देखील फोटो शेअर केला होता. या फोटोला सिद्धार्थने कॅप्शन दिले, 'पिंजऱ्यात मी होतो. अडकलेलो. तो मोकळा फिरत होता सगळीकडे.अजून एक..'

mitali mayekar,siddharth chandekar
पाऊस आला रे आला, राखीचा आनंद गगनात मावेना...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com