उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकून प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईला आलं रडू|Maharashtra Political Crisis Shiv Thakare share | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Political Crisis Shiv Thakare

उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकून प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईला आलं रडू

Maharashtra Political Crisis : राज्यातील राजकारणानं आता सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. विधानसभा निवडणूका पार पडायचा अवकाश तोच वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी घडताना दिसत आहे. त्यामध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे मविआपुढे वेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. हे सरकार कोसळून नवे सरकार पुढील काही दिवसांत स्थापन होणार की काय अशी परिस्थिती आहे. यासगळ्यात मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटींनी या (social media viral news) परिस्थितीवर आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात अभिनेत्री कंगना रनौतचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतो आहे. स्वरा भास्करनं या परिस्थितीबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता किरण माने यांच्या पोस्टनं सकाळपासून नेटकऱ्यांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. सुमित राघवन, (Bollywood celebrity) अभिनेत्री तेजस्विनी पंडित तसेच बॉलीवूडमधील अभिनेत्री गौहर खानच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रियेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यासगळ्यात बिग बॉस फेम शिव ठाकरेची एक पोस्ट भलतीच व्हायरल झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकल्यावर शिवची आई भावूक झाल्याचे दिसून आले आहे. त्यांना अश्रु अनावर झाल्याचे त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

शिव ठाकरेनं त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये त्याची आई उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकत असून त्यावेळी त्या कमालीच्या भावूक झाल्या आहेत. नेटकऱ्यांनी त्या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओवरील कमेंटस बोलक्या आहेत. खऱ्या माणसांसाठी खरी माणसं भावूक होतात, जय महाराष्ट्र या शब्दांत शिवनं आपल्या भावना हा व्हिडिओ शेयर करताना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: Eknath Shinde : तो गेलाय, पण तुम्ही घाबरू नका; फायरआजींनी घेतली CM ठाकरेंची भेट

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय परिस्थिती नाट्यमय पद्धतीनं समोर येत आहे. त्यातील घडामोडी वेगाने बदलत असून येत्या तीन ते चार दिवसांत अंतिम चित्र स्पष्ट होईल असे सांगण्यात आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आले आहे.

Shiv Thakare Video News

Shiv Thakare Video News

हेही वाचा: Viral Memes: 'ज्यांच्या हिंदूत्वात ED, CBI त्यांच्याबरोबर जाणार आम्ही!'

Web Title: Maharashtra Political Crisis Shiv Thakare Share Mothers Emotional Video Social Cm Uddhav Thackery

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top