De Dhakka2 : 'खळखळून हास्याचा आनंद लुटायला तयार राहाल!' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

de dhakka 2 news

De Dhakka2 : 'खळखळून हास्याचा आनंद लुटायला तयार राहाल!'

... तर मंडळी अभिनेता मकरंद अनासपुरे आणि त्यांची टीम तुम्हाला हसवायला पुन्हा येत आहे. निमित्त आहे 'दे धक्का' या लोकप्रिय चित्रपटाचा पुढील भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी 'दे धक्का २' (De Dhakka 2) तुम्हाला भेटायला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि सुदेश मांजरेकर यांनी केले आहे. यतीन जाधव आणि स्वाती खोपकर यांनी त्याची निर्मिती केली आहे. चित्रपट प्रदर्शित व्हायला अवघे दोन दिवस बाकी आहेत. (mahesh manjrekar say be ready for de dhakka 2 movie 2 days left for release)

हेही वाचा: Bigg Boss Marathi : 'बिग बाॅस मराठी'च्या चौथ्या पर्वात मांजरेकर नसणार?

याबाबत महेश मांजरेकर यांनी ट्विट केले आहे. ट्विटमध्ये ते म्हणतात, खळखळून हास्याचा आनंद लुटायला तयार राहा. कारण २ दिवसांत आम्ही येतोय तुमच्या जवळच्या सिनेमागृहात. ५ ऑगस्टपासून 'दे धक्का २' तुमच्या जवळच्या सिनेमागृहात! त्यांनी आपल्या पोस्टमध्ये चित्रपटाच्या ट्रेलरची लिंकही शेअर केली आहे. (Marathi Entertainment News)

हेही वाचा: Sunil Grover : छोट्या गावातून सुनील ग्रोवर आला मुंबईत, बनला मोठा अभिनेता

'दे धक्का २'चा सर्वच प्रेक्षक प्रतिक्षा करत होते. त्यांची प्रतिक्षा संपली आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या पुढील भागाचा हास्ययात्रा विदेशात भरलेली असते. मकरंद अनासपुरे, मेधा मांजरेकर, शिवाजी साटम, संतोष खापरे, सिद्धार्थ जाधव आणि गौरी इंगावले यांची प्रमुख भूमिका आहे.

Web Title: Mahesh Manjrekar Say Be Ready For De Dhakka 2 Movie 2 Days Left For Release

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..