Malaika Arujun Breakup : अर्जुनसोबतच्या ब्रेकअपवर मलायकाच्या त्या कृतीनं सगळा विषय संपवला!

लायकानं तर ज्याअर्थी अर्जूनच्या घरच्यांना इंस्टावरुन अनफॉलो केले त्या अर्थी तिनं तिचा निर्णय घेतला आहे.
Malaika Arujun Breakup
Malaika Arujun Breakup esakal

malaika arora and arjun kapoor actress unfollow actor family members on social media : मलायका अन् अर्जून कपूर यांच्या लवस्टोरीला भलेही पाच वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला असेल पण त्यांनी अजूनही लग्न केले नव्हते. यासगळ्यात या दोन्ही सेलिब्रेटींमध्ये ब्रेक अप झाल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. मलायकानं तर सोशल मीडियावरुन अर्जूनच्या घरच्यांना अनफ़ॉलो केलं आहे.

मलायका अर्जून कपूर हे बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेतील कपल म्हणून ओळखलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून या सेलिब्रेटींनी त्यांच्या नावाची वेगळी छाप चाहत्यांच्या मनात उमटवली आहे. मलायकानं आता पन्नाशी जवळ आली आहे. अर्जून चाळीशीत आहे. अशावेळी हे दोन्ही सेलिब्रेटी लग्न केव्हा करणार असा प्रश्न नेटकरी विचारु लागले होते. त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

दोघांमध्ये आता ब्रेक अप झाल्याच्या बातम्यांना उधाण आल्याचे दिसून आले आहे. त्यातच मलायकानं अर्जूनच्या घरातील काही सदस्यांना अनफॉलो केल्यानं चाहत्यांना त्या दोघांमध्ये काही आलबेल नाही हे कळून चुकले आहे. मलायकानं तर ज्याअर्थी अर्जूनच्या घरच्यांना इंस्टावरुन अनफॉलो केले त्या अर्थी तिनं तिचा निर्णय घेतला आहे. असा अंदाज बांधला आहे. त्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत.

पहिल्यांदा कित्येक महिने या दोन्ही सेलिब्रेटींनी आपल्या नात्याविषयी कोणताही खुलासा केला नव्हता. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट केले गेले. चाहत्यांना कळून चुकले की, त्यांचे अफेयर आहे. पाच वर्षांहून अधिक काळ ते रिलेशनशिप आहेत. मात्र त्यांनी लग्न केलेलं नाही. यावर मलायकानं यंदाच्या वर्षी शेवटच्या महिन्यात गुड न्यूज देणार असल्याचे म्हटले होते.

काही दिवसांपूर्वी मलायकाचा अर्जून कपूरच्या बर्थ डे पार्टीमधील तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. चाहत्यांना वाटले होते की, त्यांच्यात सगळे व्यवस्थित आहे. मात्र आता त्यांच्या ब्रेक अपच्या बातम्यांनी नेटकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com