Valentine Day: मलायका-अर्जुनची 'जादु की झप्पी'!

मलायका आणि अर्जुन कपूर (Malaika Arora) यांची लवस्टोरी (Arjun Kapoor) ही त्यांच्या चाहत्यांसाठी नवीन गोष्ट नाही.
Malaika Arora And Arjun Kapoor
Malaika Arora And Arjun Kapoor

Bollywood News: मलायका आणि अर्जुन कपूर (Malaika Arora) यांची लवस्टोरी (Arjun Kapoor) ही त्यांच्या चाहत्यांसाठी नवीन गोष्ट नाही. मात्र त्यांच्या प्रेमाला नेहमीच नेटकऱ्यांनी धारेवर धरलं आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं मलायकानं (Social Media) एक फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये ती आणि अर्जुन कपूर दोघेजण आहेत. दोन्ही सेलिब्रेटींच्या (Bollywood Celebrity) चाहत्यांनी या फोटोंना भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी मलायका अर्जुनच्या रिलेशनशिपवरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्याचे दिसून आले होते. मात्र अजूनही आपण प्रेमात असल्याचे त्यांनी या फोटोतून चाहत्यांना सांगितलं आहे. मलायका आणि अर्जुन कपूर हे दोघेही लिव इन (Entertainment News) मध्ये असल्याचे बोलले जाते. अजून त्यांनी लग्न केलेले नाही.

मलायका ही तिच्या बोल्ड (Malaika Photo) अन् बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. याशिवाय ती सोशल मीडियावर फिटनेस फ्रीक म्हणूनही प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर मलायकाच्या फोटोंना हजारोच्या संख्येनं लाईक्स आणि कमेंट्स मिळतात. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील काही रियॅलिटी शो मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत मलायका सहभागी झाली आहे. चित्रपटांपासून बऱ्याचकाळापासून लांब असलेल्या मलायकानं आपलं सारं लक्ष फिटनेस आणि रियॅलिटी शो वर केंद्रीत केलं आहे. दुसरीकडे अर्जुननं गेल्या वर्षी काही फिल्म केल्या. मात्र त्याला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्या ग्रँड सन नावाच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारल्याचे दिसून आले.

Malaika Arora And Arjun Kapoor
Video Viral: 'आई कुठे काय करते'च्या संजनाचं लग्न?

मलायका आणि अर्जुनचं नातं हे त्यांच्या चाहत्यांसाठी कायमच एक रहस्य राहिलं आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट व्हायरल झाली तरी त्याच्याकडे चाहत्यांचे लक्ष जाते. आता मलायकानं अर्जुनसोबत फोटो शेयर करुन त्याला माईन अशा शब्दांत कॅप्शन दिली आहे. यासोबत एक इमोजीही शेयर केला आहे. या दोन्ही सेलिब्रेटींच्या चाहत्यांनी पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. अर्जुननं हिंदूस्थान टाईम्सशी बोलताना मलायकाचा व्हँलेटाईन या दिवसावर विशेष भर असतो. यादिवशी ती मला नेहमीच सरप्राईज देत असते.

Malaika Arora And Arjun Kapoor
Viral Video : महिलांची अंधश्रद्धा; चारचौघात खाताहेत चाबकाचे फटके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com