Bear Grylls: आता थेट प्रियंका चोप्रा आणि विराट कोहली सोबत जंगल सफारी करणार बियर ग्रिल्स, मोठी घोषणा

आता मॅन vs वाईल्ड प्रियंका चोप्रा आणि विराट कोहली हा स्पेशल भाग काय रंगत आणणार याची सर्वांना उत्सुकता आहे
man vs wild Bear Grylls in talks with Priyanka chopra Virat kohli for his next adventurous outing
man vs wild Bear Grylls in talks with Priyanka chopra Virat kohli for his next adventurous outing SAKAL

Priyanka Chopra and Virat Kohli with Bear Grills News: मॅन vs वाईल्ड हा शो प्रचंड लोकप्रिय असा शो. गेली अनेक वर्ष मॅन vs वाईल्ड या शोने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. मॅन vs वाईल्डचा कर्ताधर्ता आहे तो म्हणजे बियर ग्रिल्स.

बियर ग्रिल्स जंगलाजंगलात, डोंगरदऱ्यांमध्ये, काट्याकुट्यांमधून फिरत अनेक ठिकाणी आजवर गेलाय. आजवर या शोमध्ये रजनीकांत, अक्षय कुमार, रणवीर सिंग अनेक इंडियन सेलिब्रिटी आले आहेत.

आता या शोमध्ये प्रियांका चोप्रा आणि विराट कोहली हे प्रसिद्ध इंडियन सेलिब्रिटी झळकणार असल्याची चर्चा आहे.

man vs wild Bear Grylls in talks with Priyanka chopra Virat kohli for his next adventurous outing
Prabhas at Tirpupati: पिक्चर हिट.. सुपरस्टार प्रभास तिरुपती बालाजीच्या चरणी नतमस्तक, फॅन्सना आनंद

याविषयी बियर ग्रिल्स म्हणतो.. “मी फिंगर क्रॉस करतोय, जर असे घडत असेल तर मज्जा येणार. आम्ही सध्या याविषयी प्लांनिंगवर काम करत आहोत. आम्ही अद्याप कशावरही शिक्कमोर्तब केलानाही, परंतु गोष्टी योग्य दिशेने जात आहेत. ”

man vs wild Bear Grylls in talks with Priyanka chopra Virat kohli for his next adventurous outing
Akshay Bhalerao: चपाती बरोबर जात का खात नाही? अक्षय भालेराव प्रकरणावर हास्यजत्रेच्या कलाकाराची जळजळीत पोस्ट

४८ वर्षीय बियर ग्रिल्स पुढे सांगतो, “पुढच्या एपिसोडमध्ये विराट कोहलीसोबत प्रियांका असण्याची शक्यता आहे. हे दोघेही असेच प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहेत.

या दोघांना जगभरात लोकप्रियता मिळते. त्यामुळे, या दोघांच्या आयुष्यात घडलेले किस्से ऐकणे, त्यांचा प्रवास आणि त्यांचे आयुष्य जाणून घेणे हा माझ्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा एक पर्वणी असेल.”

पुढील काही महिन्यांत प्रियंका आणि विराट यांच्यासोबतच्या खास भागाचं शूटिंग करण्याचा प्लॅन आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये, मॅन व्हर्सेस वाइल्ड या त्याच्या शोमधून पहिल्यांदा लोकप्रियता मिळवलेल्या ग्रिल्सने भारतात अनेक भेटी दिल्या,

ज्यात कोलकाता आणि दार्जिलिंगमधील गेटवेचा समावेश आहे. आता मॅन vs वाईल्ड प्रियंका चोप्रा आणि विराट कोहली हा स्पेशल भाग काय रंगत आणणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

प्रियंका अलीकडेच सिटाडेल या वेबसिरीजमध्ये झळकली. तर विराट सध्या WTC मध्ये व्यस्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com