'शरद पवारांविषयी अरे-तुरेची भाषा का करता?' : जितेंद्र जोशी

टीम ई-सकाळ
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

कार्यक्रमाचा सूत्रसंचालक असलेल्या जितेंद्र जोशीने सुमीत राघवन आणि सुबोध भावे या दोन्ही अभिनेत्यांना बोलतं केलं, तेव्हा त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक खासगी किस्से यावेळी शेअर केले.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेला जितेंद्र जोशी आपला नवा कार्यक्रम घेऊन आला आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील 'दोन स्पेशल' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र जोशी करत आहे. या कार्यक्रमात कलाविश्वातील अनेक कलाकारांना आमंत्रित करण्यात येत असून त्याद्वारे त्यांच्या आयुष्यातील मजेशीर आणि आतापर्यंत लोकांनी कधीही न ऐकलेल्या गोष्टींचा उलगडा केला जात आहे. 

दोन स्पेशलच्या पहिल्या भागात अभिनेता सुमीत राघवन आणि सुबोध भावे यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचा सूत्रसंचालक असलेल्या जितेंद्र जोशीने या दोन्ही अभिनेत्यांना बोलतं केलं, तेव्हा त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक खासगी किस्से यावेळी शेअर केले.

- विकी कौशल करतोय या हॉट अभिनेत्रीला डेट? बीटाऊनमध्ये चर्चांना उधाण!

या गप्पांदरम्यान सोशल मीडिया या विषयावर चर्चा झाली. त्यावेळी जितेंद्र जोशीनेही सोशल मीडियाबद्दलचे त्याचे मत व्यक्त केले. गेल्या महिन्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार आणि प्रतिस्पर्ध्यांवर टीकेसाठी सोशल मीडियाचा सर्वात जास्त वापर केला गेला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर झालेल्या टीकेबद्दल जितेंद्रने आपली नाराजी व्यक्त केली. 

- Panipat : संजूबाबाचा 'अहमद शाह अब्दाली' बघितला का?

शरद पवार यांच्या सातारा येथे झालेल्या सभेवेळी अचानक पाऊस आला. मात्र, तरीही त्यांनी भर पावसात आपले भाषण सुरू ठेवले. सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा झाली. अनेक नेटकऱ्यांनी शरद पवार यांच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक केले. पण काही विरोधी पक्षाच्या समर्थकांनी त्यांच्यावर टीकादेखील केली. यामुळे संतापलेल्या जितेंद्र जोशीने आपल्या मनातील नाराजी यावेळी व्यक्त केली. शरद पवार यांच्याबद्दल अरे-तुरेची भाषा केल्यामुळे जितेंद्रला राग अनावर झाला होता. 

- शाहरुख गीतांजलीला म्हणाला 'आमचं भवितव्य तुझ्या हाती सुरक्षित आहे!'

तो म्हणाला, 'शरद पवार भर पावसात भाषण करत असलेला एक फोटो मी पाहिला. त्या पोस्टखाली लोक अरे-तुरे अशा भाषेत कमेंट करत आहेत. एका व्यक्तीने एखाद्या क्षेत्रात अनेक वर्षे काम केले असेल, त्याच्या बद्दल तुम्ही आदराने तरी बोललं पाहिजे.'

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Actor Jitendra Joshi comment about disrespect of NCP cheif Sharad Pawar on Don Special