Actor Sachin
Actor Sachin

महागुरुंची पोस्ट: 39 वर्षांपूर्वी 18 लाखांत सिनेमा, 10 कोटींची कमाई

मराठी हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते सचिन (Actor Sachin) हे त्यांच्या अभिनय, डान्स यासाठी ओळखले जातात.

मराठी हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर (Actor Sachin) हे त्यांच्या अभिनय, डान्स यासाठी ओळखले जातात. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. (Bollywood Celebrity) सोशल मीडियावरही ते नेहमी अॅक्टिव्ह असतात. ते सध्या त्यांच्या एका पोस्टमुळे चर्चेत आले आहे. त्याचे कारण 39 वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या नदीया के पार या चित्रपटाच्या काही आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे. त्यामध्ये तो चित्रपट केव्हा प्रदर्शित झाला तो किती रुपयांत तयार झाला याविषयी त्यांनी सांगितलं आहे. सध्याच्या कोट्टीच्या कोटी उड्डाण घेणाऱ्या या बॉलीवूडपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. Marathi Hindi Movie Actor Sachin Share post On Nadiya ke Paar

सचिन हे त्यांच्या एका डान्स शो मुळे महागुरु (Mahaguru) या नावानं ओळखले जाऊ लागले. त्यांच्या कमेंट्स या खास चर्चेचा विषय होता. सोशल मीडियावर त्यांनी नदिया के पार सिनेमाच्या आठवणींना उजाळा देताना त्याच्या बजेटबद्दलपण सांगितलं आहे. सचिनजी लिहितात, 1982 मध्ये नदीया के पार हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट त्यावेळी 18 लाख रुपयांमध्ये तयार झाला होता. या चित्रपटानं दिल्लीमध्ये अडीच कोटी, पूर्वेकडच्या काही राज्यांमध्ये साडेतीन कोटी देशातल्या इतर काही राज्यांमध्ये 4 कोटींचा व्यवसाय केला होता. याशिवाय अलाहाबादमधील एका थिएटरमध्ये हा चित्रपट तब्बल 136 आठवडे सुरु होता. यावरुन त्याची लोकप्रियता लक्षात येईल. वेगवेगळ्या ठिकाणी हा चित्रपट 100 आठवडे सुरु होता.

Actor Sachin
Video Viral: 'बुरखा' घालून नोराच्या गाण्यावर 'मायलेकींचा' डान्स

सचिन यांनी हिंदीतील अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी कामही केलं आहे. ते अभिनेते असण्यासोबतच निर्माते आणि दिग्दर्शकही आहेत. त्यांच्या मराठी चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांची अमाप लोकप्रियता मिळवली आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास अशीही बनवा बनवीचा उल्लेख करावा लागेल. या चित्रपटानं सचिनजींना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले.

Actor Sachin
Video: रुग्णसंख्या घटली, शाळांची घंटा वाजली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com