Marathi Rangbhumi Din : संगीत रंगभूमी ते ‘मुघले आझम’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Rangbhumi Din

Marathi Rangbhumi Din : संगीत रंगभूमी ते ‘मुघले आझम’

Marathi Rangbhumi Din : मंडळी, हिंदी रंगभूमीवर सादर करण्यात आलेलं ‘मुघले आझम’ हे नाटक बघण्याचा योग कालच आला. ‘अप्रतिम’ हा एकच शब्द या नाटकाच्या परीक्षणाच्या बाबतीत लिहीन. अप्रतिम सेट्स, साउंड, ड्रेसेस, कलाकार आणि तंत्रज्ञ या सर्व बाजूंनी नटलेले एक अतिशय सुंदर, काव्यात्म नाटक. यात अनारकली व बहार या त्यांच्या स्वतःच्या आवाजात लाइव्ह गात होत्या.

हेही वाचा: Marathi Rangabhumi Din : मराठी रंगभूमी दिन 5 नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो?

हे सर्व पाहिल्यावर मला आपली संगीत रंगभूमी आठवली. त्यातही त्यातही कलाकार स्टेजवर लाइव्ह गात असत. गद्याच्या गोडीला पद्याचाही तितकाच प्रभाव असे. लोक नाट्यसंगीतावर माना डोलवत व वन्स मोअरची दाद देऊन कलाकारांचा उत्साह वृद्धिंगत करत. नाट्यसंगीताच्या त्या काळात एलपी अर्थात काळ्या तबकड्या निघत- ज्या ग्रामोफोनवर ऐकल्या जात होत्या.

हेही वाचा: Marathi Bhasha Din : मराठी भाषा दिनानिमित्तने 'गर्जतो मराठी'; पाहा व्हिडीओ

खरंतर विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक आहेत. इसवीसन १८४३ मध्ये ‘सीता स्वयंवर’ हे नाटक त्यांनी रंगभूमीवर आणले. सन १८७९ मध्ये लेखक व निर्माते त्रिलोकेकर यांनी ‘नल-दमयंती’ हे नाटक आणलं. पुढच्या काळात अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं ‘शाकुंतल’ हे मराठी संगीत नाटक खूपच लोकप्रिय झालं.

हेही वाचा: Marathi Rajbhasha Din बालसाहित्यिकांचा नगरमध्ये भरला कुंभमेळा 

त्यानंतर कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांचं ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत शारदा’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘रामराज्य वियोग’, ‘संगीत मानापमान’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘गीत गाती ज्ञानेश्वर’, ‘संगीत सुवर्णतुला’, ‘एकच प्याला’, ‘मदनाची मंजिरी’, ‘पुण्यप्रभाव’, ‘लेकरे उदंड जाहली’ ही आणि अशी इतर अनेक संगीत नाटकं आली आणि लोकांना ती खूप आवडलीसुद्धा.

हेही वाचा: marathi bhasha din 2020 ; बेळगावात आज मराठीचा जागर; मराठी भाषिकांना पर्वणी 

बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर, मास्टर कृष्णराव, रामदास कामत, जितेंद्र अभिषेकी, वसंतराव देशपाडे, जयराम व जयमाला इमामदार, त्यांच्या कन्या कीर्ती व लता शिलेदार, ज्योत्स्ना भोळे, फय्याज या आणि इतर असंख्य कलाकारांनी संगीत रंगभूमीला सोनेरी दिवस दाखवले. अजित कडकडे, महेश काळे, राहुल देशपांडे या आणि अनेकांनी ही उज्ज्वल परंपरा पुढे चालवली आहे.आता सध्या मराठी रंगभूमीवरील ‘देवबाभळी’ हे संगीत नाटक अतिशय सुरेख आहे. जरूर पाहा.

हेही वाचा: Marathi bhasha din 2020 "अक्षरा'चा मराठीत मानाचा तुरा 

मुघलकालीन शाही थाट ‘मुघले आझम’ या नाटकात खूप सुंदर तऱ्हेनं दाखवण्यात आला आहे. आता एलसीडी स्क्रीनची सोय आहे, त्यामुळे अगदी हवा तसा देखावा आपण उभा करू शकतो; पण पूर्वीच्या काळी वरून पडदे सोडायची प्रथा असे, त्यामुळे बागेचा देखावा, राजवाड्याची दृश्ये, नदीकिनारा, कैदखाने, घर किंवा घराची ओसरी असे रंगवलेले पडदे मागील बाजूला असायचे व त्यामुळे नेपथ्याची सोय होत असे.

हेही वाचा: Marathi bhasha din 2020 "अक्षरा'चा मराठीत मानाचा तुरा 

मंडळी, मी लंडनला चार महिने होते, तेव्हा तिथले थिएटर पाहण्याची संधी मी जराही सोडली नाही. ‘लायन किंग’ चित्रपटात जेवढी भव्यता आहे, तितकीच भव्यता नाटकातही आहे. उत्तमोत्तम ऑपेराज मी आवर्जून पाहते. मग मी तिथे तिकीट केवढ्याला आहे, हे पाहत नाही.

हेही वाचा: Hindi Din : हिंदी राष्ट्रप्रेमाची भाषा; हिंदी दिनानिमित्त अमित शाहांकडून गौरवोद्गार

थोडं शॉपिंग कमी झालं तरी चालेल; पण आयुष्यातले हे अनुभव खूप श्रीमंत करून टाकणारे असतात. अशोक हांडेने ‘मराठी बाणा’ खूपच सुंदर सादर केलेला एक ऑपेराच आहे. मराठी माणूस आणि त्यांचं नाट्यवेड हे काही सांगायलाच नको. त्यामुळेच तर नाटकांना लोकाश्रय आणि राजाश्रय मिळत आहे व तो असाच मिळत राहो, ही परमेश्वराकडे प्रार्थना.