शुद्धी कदम ठरली ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ची विजेती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mi honar superstar chhote ustad  winner shuddhi kadam

शुद्धी कदम ठरली ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ची विजेती

प्रत्येक प्रतिभावान कलाकाराला त्याच्या कलेसाठी हवं असतं एक हक्काचं व्यासपीठ. ज्याद्वारे तो त्याची कला लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. गायनाचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांसाठी स्टार प्रवाह (star pravah) वाहिनीने असाच एक मंच उभारला तो म्हणजे, ''मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद''. (mi honar superstar chhote ustad) या सांगीतिक कार्यक्रमामुळे गेली काही महिने महाराष्ट्र मंत्रमुग्ध केलं होतं.या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला.

हेही वाचा: माझी तुझी रेशीमगाठ : प्रार्थना बेहरेचा मालिकेला रामराम..

राजयोग धुरी, शुद्धी कदम, सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार आणि सायली टाक हे सहा स्पर्धां महाअंतिम फेरीत दाखल झाले होते. या सहा स्पर्धकांमध्ये अंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत ठाण्याच्या शुद्धी कदमने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेते ठरले सार्थक शिंदे आणि राजयोग धुरी. सायली ठाक ठरली तृतीय क्रमांकाची मानकरी, तर सिद्धांत मोदी आणि राधिका पवारला उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आलं. विजेती शुद्धी कदमला चार लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. (shuddhi kadam wins mi honar superstar chhote ustad trophy)

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना शुद्धी कदम भावूक झाली होती. हा दिवस स्वप्नवत असल्याची भावना तिने व्यक्त केली. महाअंतिम सोहळ्यात सामील होण्यासाठी शुद्धीने बरीच मेहनत घेतली होती. महाअंतिम सोहळ्यातलं उत्तम सादरीकरण तिला विजेतेपद देऊन गेलं. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे शुद्धी कदम आणि तिचे कुटुंबिय आनंदात आहेत.

हेही वाचा: सलामान खान आणि आनंद दिघे यांच्यात समान आहेत या तीन गोष्टी..

शुद्धीने शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या मंचावर तिने गाण्याचे वेगवेगळे प्रकार सादर केले. 'या मंचाने सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, अविनाश-विश्वजीत गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळाल्याची भावना शुद्धीने व्यक्त केली.' शुद्धी कदम या पर्वाची विजेती असली तरी महाअंतिम फेरीतील सर्वच स्पर्धकांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे.

Web Title: Mi Honar Superstar Chhote Ustad Winner Shuddhi Kadam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top