Money Heist मधल्या स्टॉकहोमच्या घरी 'गणपती बाप्पा': फोटो व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Money heist
Money Heist मधल्या स्टॉकहोमच्या घरी 'गणपती बाप्पा': फोटो व्हायरल

Money Heist मधल्या स्टॉकहोमच्या घरी 'गणपती बाप्पा': फोटो व्हायरल

जगभरात प्रचंड लोकप्रिय झालेल्या वेब सीरिजमध्ये मनी हाईस्टचे (Money Heist) नाव घेतले जाते. या मालिकेनं भारतातही (India) मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली होती. दोन महिन्यांपूर्वी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला होता. मुळ स्पॅनिश भाषेत असणाऱ्या या मालिकेनं प्रेक्षकांना वेड लावलं होतं. कोट्यवधी चाहते या मालिकेनं मिळवले. विशेष म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं नव्हे तर शहरांची नावं असणाऱ्या मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला होता. त्यामध्ये टोकियो, स्टॉकहोम, रियो, हेलसिंकी यासारख्या इतर व्यक्तींनी प्रेक्षकांना आपलंस करुन टाकलं होतं. आता या मालिकेतील सर्वात लोकप्रिय अशा मोनिकानं उर्फ स्टॉकहोमची (Ester Acebos) चर्चा सुरुयं. त्याला कारणही तसचं खास आहे.

स्टॉक होम्सच्या (stock homes) घरी चाहत्यांना गणरायाचा फोटो दिसला आहे. त्यामुळे त्यांनी तिचं कौतूक केलं आहे. मनी हाईस्टमधल्या इस्टर एचिबोनं आता चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हाय़रल (Social Media viral) झाले आहे. त्यामध्ये तिच्या घरी चाहत्यांना गणपती बाप्पाचा फोटो असल्याचे दिसून आले आहे. आपल्या घरातील गणराच्या फोटोसमोर मोनिका उभी असल्याचे दिसून आले आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अनेकांनी तिचं कौतूकही केलं आहे. इस्टर ही एक स्पॅनिश अभिनेत्री आहे. मनी हाईस्टनंतर तिच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यानंतर तिला वेगवेगळ्या चित्रपटांची ऑफरही आली आहे. सुरुवातीला नाटक आणि छोट्या जाहिरांतीमध्ये काम करणाऱ्या इस्टरला लोकं आता ओळखू लागले आहेत.

हेही वाचा: Money Heist 5 Review; 'शेवटी प्रोफेसर जिंकले की हरले'?

गेल्या दोन वर्षांपासून मनी हाईस्ट सातत्यानं चर्चेत आलं आहे. त्याला कारण त्या मालिकेची उत्कंठावर्धक कथा. आणि त्या कथेचा वेग. यामुळे या मालिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या सोशल मीडियावरील अनेक युझर्सनं मोनिकाचे फोटो व्हायरल केले आहेत. तिच्या घरात लाडका बाप्पा विराजमान असल्याचे चाहत्यांना दिसून आले आहे. त्यामुळे तिच्यावर कौतूकाचा वर्षाव झाला आहे. ते फोटो इस्टरच्या इंस्टाग्रामवर सुरु असणाऱ्या लाईव्ह सेशनमधून व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा: Money Heist Season 5 Part 2: ट्रेलर प्रदर्शित होताच मीम्सचा वर्षाव

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top