मुंबई : मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मिडीयावर नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते. मृण्मयीला ट्रेकींग आणि फिरण्याची खुप आवड आहे. ती वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करतानाचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करते. मृण्मयी आणि स्वप्निलने नुकताच ऋषिकेश वॅलीमध्ये केलेल्या ट्रेकचे फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे.
सीक्रेट्स ऑफ लव्ह' तून होणार ओशोंचे दर्शन; मुख्य भूमिकेत रविकिशन
सध्या मृण्मयी तिच्या नवऱ्यासोबत सोबत ट्रेकिंगचा आनंद लूटत तिची सुट्टी एन्जोय करत आहे. मृण्मयी आणि स्वप्निलने नुकताच हृषिकेश वॅलीमध्ये एक ट्रेक केला. त्याआधी मृण्मयी आणि स्वप्निल मसूरीमध्ये होते. तिथे फिरताना स्वप्निल आणि मृण्मयी मिळून 'ना तुम हमे जानो' हे गाणं गायलं. या गाण्याचा व्हिडीओ मृण्मयीने सोशल मिडीयावर पोस्ट केला. तेथील थंडीमध्ये शेकोटीचा आनंद मृण्मयीने घेतला. तसेच तेथील निसर्गसौदर्याचे सुंदर फोटो स्वप्निल आणि मृण्मयीने पोस्ट केले.
गुरु रंधवाच्या नाकातून आलं रक्त; कश्मिरच्या जीवघेण्या थंडीत सुरु होतं शुटिंग
हृषिकेश वॅली आधी मृण्मयी गोव्याला गेली होती. तेव्हा देखील मृण्मयी आणि स्वप्निल खूप एन्जॉय केला. समुद्र किनाऱ्यावर मृण्मयी आणि स्वप्निलने कपल फोटोशूट केले. बीचवर मृण्मयी काढलेले फोटोंची खूप चर्चा झाली. या फोटोंमध्ये मृण्मयीचा हॅाट अंदाज चाहत्यांना पहायला मिळाला. हे फोटो शशांक साने यांनी काढले होते.
मृण्मयी देशपांडे हीने मोकळा श्वास, कट्यार काळजात घुसली, नटसम्राट, फर्जंद, शिकारी या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
सिद्धार्थच्या गोंधळात गोंधळ; सोनाली कुलकर्णीने दिल्या हटके शुभेच्छा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.