मुक्ता बर्वेचा आक्रमक अंदाज.. ‘ वाय ’ चित्रपटाच्या पोस्टरने लक्ष वेधले

बहुचर्चित ’ वाय ' चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकाच्या भेटीला आले आहे.
mukta barve's new movie 'Y' poster release
mukta barve's new movie 'Y' poster release sakal

Marathi movie : गेली काही दिवस आपल्याकडे 'वाय' (Y) चित्रपाटाची भलतीच चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाचे कथानक अद्याप समोर आले नसले तरी हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे यामध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वे (mukta barve) प्रमुख भूमिकेत आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू असून अनेक कलाकार, प्रेक्षक आणि अनेक मान्यवर मंडळी हातामध्ये 'वाय' अक्षर लिहीलेले पोस्टर घेऊन चित्रपटाला पाठिंबा देत आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर लाॅंच करण्यात आले. यामध्ये मुक्ताचा आक्रमक अंदाज समोर आला आहे. (mukta barve's new marathi movie 'Y' poster release) ( 'Y' marathi movie ) (mukta barve latest news)

mukta barve's new movie 'Y' poster release
सोनाली कुलकर्णीने घेतला खास उखाणा, हनिमूननंतर थेट सासरच्या सेवेत..

या पोस्टरमध्ये मुक्ता बर्वे एका आक्रमक अंदाजात हातात मशाल घेऊन लढताना दिसत आहे. तिचा हा लढा नेमका कोणासाठी आणि का आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहेत. या चित्रपटात मुक्ता बर्वे सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रथितयश कलाकार आहेत. मात्र सध्या तरी त्यांची नावे गुलदस्त्यात आहेत.

mukta barve's new movie 'Y' poster release
PHOTO : अण्णांची शेवंता दुबईत करतेय धमाल

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अजित सुर्यकांत वाडीकर म्हणतात, ‘’या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सुरू केलेल्या उपक्रमाला मान्यवर कलाकार, विविध क्षेत्रातील दिग्गज तसेच सर्वसामान्यांनीही पाठिंबा दिला आहे. अगदी राजकीय नेतेही त्यात मागे नाहीत. खुर्चीला खिळवून ठेवतानाच प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा हा थरारपट मराठीतील पहिलाच हायपरलिंक चित्रपट असेल. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ' हायपरलिंक ' हा मराठी चित्रपटाचा नवीन आकृतिबंध प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.’’

कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची असून पटकथा आणि संवाद अजित वाडीकर,स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. तर कार्यकारी निर्मात्याची धुरा विराज विनय मुनोत यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com