''लता मंगेशकरांसारखं भाग्य माझं कुठे,माझ्या निधनानंतर जर...''

इन्स्टाग्रामवरील लाइव्ह सेशनच्या दरम्यान अभिनेत्री मुमताझ यांनी चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधला,अगदी आपल्या निधनावरही .
Mumtaz
MumtazGoogle

ज्येष्ठ अभिनेत्री मुमताझ (Mumtaz) यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या पतीराजांना घेऊन मोठा खुलासा केला आहे. बॉलीवूडमध्ये(Bollywood) पुन्हा काम करण्याचा विचार आहे का या प्रश्नावर उत्तर देताना मुमताझ यांनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. त्या म्हणाल्या,'' एकतर मला वाटत नाही की माझ्याकडे आता अशी एखादी भूमिका येईल जी लोकांनाही आवडेल आणि मलाही''. बॉलीवूड संदर्भातील अनेक प्रश्वांवर मुमताझ यांनी मनमोकळा संवाद साधला. खरंतर हे प्रश्न मुमताझ यांना इन्स्टाग्रामवरील लाइव्ह सेशनमध्ये त्यांच्या चाहत्यांनीच विचारले होते. आणि या सेशनचं खास आयोजन केलं होतं मुमताझ यांची मुलगी तान्या माधवानीनं.

Mumtaz
Video:'तम्मा तम्मा' गाण्यावर माधुरीच्या पतिराजांनी केला एकदम कडक डान्स

मुमताझ यांनी आपण लवकरच मुंबईत परतणार आहोत असं देखील सांगितलं त्या सेशनमध्ये. या सेशन दरम्यान मुमताझ यांची मुलगी तान्यानं चाहत्यांना एक विनंती केली आहे. तिनं सांगितलं की,''मुमताझना भारतात परतल्यावर घराबाहेर पडायला सांगा. त्या कधीच घराबाहेर जात नाहीत. कृपया,तिला बाहेर पडायला सांगा''. पण मुमताज म्हणाल्या की,'' हे थोडं कठीण वाटतंय.पण बघू''. पुढे तान्यानं मुमताजसाठी आलेले चाहत्यांचे काही संदेश वाचून दाखवले. जे ऐकताना काही क्षण मुमताजही भारावल्या. मुमताजच्या सौंदर्याचं रहस्य जेव्हा चाहत्यांनी विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या,'' तुम्हाला माझ्या सौंदर्याचं रहस्य सांगायला मी कधीही तयार आहे.''. या चॅटिंग सेशनच्या शेवटी मुमताज यांनी आपल्या चाहत्यांना विनंती केली की,''असंच प्रेम माझ्यावर कायम राहू दे. माझ्या निधनानंतर रडू नका. जसं लता मंगेशकर यांच्या जाण्यानंतर तुम्ही चाहते रडला होतात,जी जमलेली गर्दी मी पाहिली हे माझ्या वाट्याला आलं तर ते माझं परमभाग्य''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com