Nawazuddin Siddhiqui transgender woman look in haddi
Nawazuddin Siddhiqui transgender woman look in haddi Google

Nawazuddin Siddhiqui In Haddi: साडी,झुमके,बांगड्या घालून दिसला नवाझुद्दीन,स्त्री वेशात ओळखूच येईना...

आगामी 'हड्डी' सिनेमात नवाझुद्दीननं रियल लाइफ ट्रान्सजेडर्ससोबत काम केलं आहे.

Haddi: नवाझुद्दीन सिद्दिकीचा आगामी सिनेमा 'ह्ड्डी' सध्या जोरदार चर्चेत आहे. या सिनेमात नवाझुद्दीन सिद्दिकीने आतापर्यंत केलेल्या त्याच्या व्यक्तिरेखांपेक्षा वेगळी आणि इंट्रेस्टिंग भूमिका साकारली आहे. या सिनेमात त्यानं एका ट्रान्सजेंडर महिलेची व्यक्तिरेखा साकारली आहे. सिनेमातून अभिनेत्याचा जेव्हा फर्स्ट लूक समोर आला, तेव्हा तो पाहून सगळेच थक्क झालेयत. या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्यानं रियल लाइफ ट्रान्सजेंडर्ससोबत काम करण्याचा आपला अनुभव कसा होता हे सांगितलं आहे.(Nawazuddin Siddhiqui transgender woman look in haddi)

'हड्डी' सिनेमात नवाझुद्दीन सिद्दिकीनं तब्बल ८० ट्रान्सजेंडर्ससोबत काम केलं आहे. नवाझुद्दिनने ट्रान्सजेंडर्ससोबत काम करायला मिळालं हे आपलं भाग्य असल्याचं म्हटलं आहे. नवाझुद्दिन सिद्दिकीनं 'हुड्डी' सिनेमात काम करण्याविषयीचा आपला अनुभव शेअर करत सांगितले आहे की हड्डी मध्ये रिअल लाइफ ट्रान्सजेंडर्ससोबत काम करण्याचा आपला अनुभव खूपच छान होता. ही माझ्यासाठी सम्मानाची गोष्ट होती.या सिनेमाच्या माध्यमातून मला या समुदायाविषयी अधिक जाणून घेण्याचे आणि बऱ्याच गोष्टी शिकण्याचे भाग्य लाभले. त्यांची उपस्थिती माझा कामाप्रतीचा उत्साह वाढवणारी ठरली.

Nawazuddin Siddhiqui transgender woman look in haddi
Janhvi Kapoor Home: जान्हवीला बाथरुमचा दरवाजा बंद करु द्यायची नाही आई,चेन्नईचं 'ते' घर दाखवत म्हणाली..

आता नवाझुद्दिनचा आणखी एक लूक शेअर करण्यात आला आहे. यावेळी मात्र नवाझुद्दीन सिद्दिकी साडी नेसून ट्रेडिशनल अवताराता दिसत आहे. नव्या लूकमध्ये त्यानं ग्रीन रंगाची साडी नेसली आहे. माथ्यावर लाल रंगाची बिंदी,डार्क शेडची लिपस्टिक,लांब मोकळ्या केसात अभिनेता कमाल दिसतोय. त्यानं नाकात चमकी देखील घातलीय अन् गळ्यात नेकलेस.

साडीला मॅचिंग कलरच्या बांगड्या घालून नवाझुद्दीनचा ट्रान्स लूक कम्प्लिट करण्यात आलाय. त्याला पाहून जो तो त्याची प्रशंसा करत सुटला आहे. नवाझुद्दीन इतर अनेक ट्रान्सजेंडरच्या मध्ये उभा राहून कॅमेऱ्याला पोझ देताना देखील दिसला. एका क्षणासाठी तर ओळखूच येईना.

'हड्डी' सिनेमाविषयी बोलायचं झालं तर हा एका बदल्यावर आधारित सिनेमा आहे. याला अक्षत अजय शर्मानं दिग्दर्शित केलं आहे. सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे. आता पहायचं नवाझुद्दीन आपल्या 'हड्डी' सिनेमासोबत बॉक्सऑफिसवर किती मोठा धमाका करतोय.

Nawazuddin Siddhiqui transgender woman look in haddi
Hemant Dhome Post: 'क्षिती आणि माझं दुसरं बाळ…',' हेमंत ढोमेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

'हड्डी' सिनेमातून जेव्हा मेकर्सनी नवाझुद्दीन सिद्दिकीच्या ट्रान्स वुमनचा पहिला लूक शेअर केला होता,तेव्हा प्रत्येकजण पाहून थक्क झाला होता. ग्रे कलरचा शिमरी गाऊन आणि बोल्ड मेकअपमध्ये नवाझुद्दिन सिद्दिकीचा लूक इतका सॉल्लीड वाटत होता की त्याला ओळखणं देखील कठीण होऊन बसलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com