Neena Gupta : 'माझ्यामुळे मुलीचा घटस्फोट, माझी चूक झाली', नीना गुप्ता काय बोलून गेल्या!

नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा ही एक लोकप्रिय सेलिब्रेटी आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे.
Neena Gupta On Masaba Gupta Divorce
Neena Gupta On Masaba Gupta Divorceesakal

Neena Gupta On Masaba Gupta Divorce : नीना गुप्ता यांनी वयाची साठी ओलांडली तरी त्यांचे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणे, त्यांचे फोटो, व्हिडिओ यांना चाहत्यांकडून मिळणारा प्रतिसाद जोरदार असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून नीना गुप्ता यांनी वेगवेगळ्या चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा ही एक लोकप्रिय व्यक्ती आहे. ती एक अभिनेत्री, फॅशन डिझायनर आहे. काही दिवसांपूर्वी तिचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली होती. त्यावर नीना गुप्ता यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.यावेळी त्यांनी आपल्याकडून काही चूका झाल्याचे म्हटले आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

आपण आई म्हणून खूप जबाबदाऱ्या पार पाडू शकलो नाहीत. माझ्याकडून आई म्हणून अनेक कमतरता राहिल्या. त्याच्या परिणामाला मला सामोरं जावं लागलं. आणि मी हे मान्य करते असे नीनाजी यांनी म्हटले आहे. माझ्या चुकीची शिक्षा ही माझ्या मुलीला भोगावी लागली. त्यामुळेच तिचा घटस्फोट झाल्याचे नीनाजी यांनी म्हटले आहे. यामुळे सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री ट्विंकल खन्नाच्या ट्विक इंडिया नावाच्या शोमध्ये नीना गुप्ता आल्या होत्या. यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला. यात त्यांनी आपल्याकडून अनेक चुका झाल्या आणि त्याची शिक्षा मुलीला मिळाली असे म्हटले आहे. माझ्या मुलीचा जो घटस्फोट झाला त्याला कारणीभूत मी आहे. असेही नीनाजींनी म्हटले आहे. यावेळी मसाबानं म्हटले की, आईची इच्छा होती की, मी लवकर विवाहबद्ध व्हावे. आणि आता माझा घटस्फोट झाल्यानंतर ती मोडून पडली आहे.

Neena Gupta On Masaba Gupta Divorce
Jawan Shah Rukh Khan : 'हे माझं शेवटचं टक्कल, यानंतर मी पुन्हा कधीही....!' किंग खाननं सांगून टाकलं

आईला खूप वाईट वाटले जेव्हा तिनं माझ्या घटस्फोटाची बातमी ऐकली. तुमचा संसार आता कुठे सुरु झाला होता आणि इतक्यात तुमचा घटस्फोटही झाला. याचे मला वाईट वाटले असे नीनाजींनी म्हटले आहे.

मला लग्नापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे होते. मी तसे आईला बोललेही होते. पण तिनं मला परवानगी दिली नाही. त्यामुळे माझं नातं हे फार काळ टिकलं नाही. आम्ही एकमेकांना समजून घेऊ शकलो नाही. असे मसाबानं यावेळी सांगितले.

आईला असे वाटायचे की, तिनं तिच्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या मी करु नये. आणि त्याची मोठी किंमत मला मोजावी लागु नये. यासगळ्या प्रकारामुळे आई खूपच अस्वस्थ झाली होती. असेही मसाबानं त्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले. सध्या मसाबा तिचा दुसरा पती सत्यदीप मिश्रा सोबत संसार करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com