Alia Bhatt Pregnancy: 'आता एवढ्या घाईनं पायऱ्या उतरायच्या नाही सुनबाई'!

व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.
Alia Bhatt Pregnancy:
Alia Bhatt Pregnancy: esakal

Alia Bhatt Pregnancy: लग्नाला चारच महिने झाले तोच आलियानं दिलेल्या गोड बातमीनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. चाहत्यांना आपल्या आवडत्या अभिनेत्रीची गुड न्युज असल्याचं मोठं अप्रुप आहे. त्यामुळे त्यांनी तिला मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा देखील दिल्या आहेत. आता आलिया आणि तिची सासू नीतू कपूर या एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आल्या आहेत. एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये नीतूजी आलियाला येत्या काळात आपण कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी याविषयी सांगताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आलिया, रणबीर आणि नीतू कपूर हे तिघेजण डिनरसाठी बाहेर गेले होते. त्यावेळी नीतू रणबीरचा हात धरुन चालताना दिसत आहे. दुसरीकडे आलिया जेव्हा पायऱ्या उतरते तेव्हा नीतू रणबीरकडे पाहून त्याला काही इशारा करताना दिसत आहे. त्याचवेळी रणबीर लगेच आलियाला मदत करण्यासाठी हात पुढे करताना दिसतोय. त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन कपूर कुटुंबियावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

Alia Bhatt Pregnancy:
Viral: थेट 'हनुमाना'लाच रेल्वे पोलिसांची नोटीस, 'दहा दिवसांत जर...'

आलिया आता लवकरच आई होणार आहे. त्यामुळे कपूर कुटूंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यापूर्वी देखील आलियाच्या बेबी शॉवरचे फोटो व्हायरल झाले होते. त्यालाही नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी आलिया, रणबीर आणि नीतूजी या बांद्र्यातील एका अलिशान हॉटेलमध्ये गेले होते. तिथून बाहेर पडताना नेटकऱ्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केल्याचे दिसून आले आहे.

Alia Bhatt Pregnancy:
Double XL Trailer: 'मुलांना ब्रा मोठी हवी पण कंबर बारीक'!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com