आईच्या आवाजानं रडते, बापानं घेतलं की हसते, प्रियंका - निकची गोड 'मालती' |Nick Jonas bonding with daughter Malti Marie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nick Jonas bonding with daughter Malti Marie

आईच्या आवाजानं रडते, बापानं घेतलं की हसते, प्रियंका - निकची गोड 'मालती'

Bollywood News: केवळ हॉलीवूडच नाही तर जगभरामध्ये आता अभिनेत्री प्रियंका आणि निक जोन्स हे त्यांच्या हटकेपणासाठी प्रसिद्ध आहेत. या दोन्ही कपल्सला (Bollywood Actress) मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी कन्यारत्न झाले. त्यांनी तिचे नाव मालती असे ठेवले. आता त्यांच्या मालतीचे (Mali Jones) काही व्हिडिओ सोशल मीडियावरुन चर्चेत आले आहे. त्यामध्ये प्रियंका मालती झोपवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र ती तिचे काही केल्या ऐकत (Priyanka Chopra) नाही. निककडे गेल्यावर मात्र ती झोपी गेली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. मालती आणि निकच्या त्या बाँडिंगला प्रियंकानं कमेंट केली आहे. सध्या प्रियंका तिचं मातृत्व इंजॉय करताना दिसत आहे. त्यानिमित्तानं तिनं काही खास व्हिडिओही शेयर केले आहे. त्यावर तिच्या चाहत्यांनी तिला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही केल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मालतीची पहिली झलक साऱ्या जगाला दिसली होती. त्यावर नेटकऱ्यांनी त्या पोस्टवर प्रियंका आणि निकचं कौतुक केलं होतं. त्या व्हिडिओमध्ये निक मालतीची काळजी कशी घेतो हे प्रियंकानं दाखवलं आहे. तिच्याकडे मालती असल्यावर रडते. मात्र निककडे गेल्यावर ती शांत असते. झोपी जाते. त्यांच्या या अनोख्या बाँडिंगचं तिनं तोंडभरुन कौतुक केलं आहे. तो व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला आहे.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

प्रियंका आणि निकची मालती ही तीन महिन्यांपासून एनआयसीयुमध्ये होती. ती काही दिवसांपूर्वीच घरी आली आहे. एका न्युज पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, निकनं लेक मालतीला शांत करण्यासाठी एक अनोखी आयडीया केली आहे. त्यामध्ये तो तिच्यासाठी गाणं म्हणु लागतो, त्यात मालती शांत झोपी जाते. असे दिसून आले आहे. निकचा आवाज ऐकल्यावर ती शांतपणे त्याच्याकडे पाहते आणि हसते. असेही त्या व्हिडिओमधून दिसून आले आहे.

हेही वाचा: Video Viral : सैफ अली खानचा लेक कोणाला करतोय डेट ?

Web Title: Nick Jonas Bonding With Daughter Malti Marie Video Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top