'सासुबाई तुम्ही तर एकदम...' मधु चोप्रांच्या फोटोवर निकची कमेंट चर्चेतNick Jonas | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nick Jonas reacts to mother-in-law Madhu Chopra's picture.

'सासुबाई तुम्ही तर एकदम...' मधु चोप्रांच्या फोटोवर निकची कमेंट चर्चेत

प्रियंका चोप्रा(Priyanaka Chopra)ची आई मधु चोप्रा(Madhu Chopra) सध्या गोव्यात(Goa) सुट्टयांचा आनंद घेत आहेत. त्यांनी तिथले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यातील मधु चोप्रा यांच्या एका फोटोवर प्रियंकाचा नवरा निक जोनस(Nick Jonas)नं दिलेली प्रतिक्रिया सध्या चांगलीच चर्चेत आहे. प्रियंकानं अमेरिकन सिंगर निक जोनसशी २०१८ मध्ये लग्न केलं होतं. २०२२ मध्ये त्या दोघांनी सरोगसीच्या माध्यमातून त्यांच्या पहिल्या अपत्याचं घरात स्वागत केलं आहे. प्रियंकानं अद्याप आपल्या मुलीचा फोटो कुणाला दाखवला नसल्यानं सध्या तिच्या मुलीविषयी सगळ्या चाहत्यांमध्ये उत्सुकला पहायला मिळतेय.

असो, आपण बोलत होतो मधु चोप्रा यांच्या फोटोविषयी आणि त्यावर त्यांना जावयानं दिलेल्या प्रतिक्रियेविषयी. मधु चोप्रा यांनी तो फोटो पोस्ट करीत लिहिलंय,''मी गोव्यात आहे''. त्या फोटोत त्यांनी निळ्या रंगाचा आऊटफिट घातला आहे. त्यावर निकने प्रतिक्रिया दिलीय,''सासुबाई घायाळ करणारा लूक,सुंदर दिसत आहात''. झालं,निकनं नुसती प्रतिक्रिया नोंदवली नाही तर सासुबाई मधु चोप्रा यांचा फोटो व्हायरल झाला ना एकदम. मधु चोप्रा यांच्या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा: मलायका अरोराचे 'मराठी अफेअर'? रोमान्स करताना व्हिडीओ झाला व्हायरल

मधु चोप्रा यांच्या फोटोवर किंवा पोस्टवर अनेकदा निक व्यक्त होताना दिसतो. तेव्हा मधु चोप्रा देखील त्याच्या प्रतिक्रियांवर हटके अंदाजात उत्तर देतात. प्रियंकाचं निकशी लग्न ठरल्यापासून मधु चोप्रा यांनी प्रत्येक वेळेला सोशल मीडियावर निकची प्रशंसाच केली आहे. ''निक खूप शांत आहे,समजूतदार आहे'' असे कौतूक करताना त्या नेहमीच दिसल्या आहेत. आता निकनं त्यांच्या फोटोवर दिलेल्या हॉट कमेंटवर मधू चोप्रा कशा रिअॅक्ट होतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.

Web Title: Nick Jonas Reacts To Madhu Chopras Goa Pic Mother In Law Is Killing

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top