Nora Fatehi: ढसाढसा रडणाऱ्या चाहतीला मिठीत घेऊन असं काय केलं नोरानं की नेटकरी करु लागले ट्रोल..Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nora Fatehi console crying fan, video viral, Netizens troll actress

Nora Fatehi: ढसाढसा रडणाऱ्या चाहतीला मिठीत घेऊन असं काय केलं नोरानं की नेटकरी करु लागले ट्रोल..

Nora Fatehi: नोरा फतेहीने आपल्या दिलखेचक अदांनी आणि भन्नाट नृत्याविष्कारानं फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये एक खास स्थान निर्माण केले आहे. अभिनयात तिला फारसे यश मिळाले नसेल, पण नृत्याच्या बाबतीत तिने सर्वांवर जादू केली आहे. (Nora Fatehi console crying fan, video viral, Netizens troll actress)

हेही वाचा: Exclusive:'धमक्यांना भीत नाही,माझा पुढचा चित्रपटही महाराजांवरच..','हर हर महादेव'च्या दिग्दर्शकाचा खुलासा

आजच्या तारिखमध्ये बॉलीवूडचे मोठे सिनेमे नोराच्या खास डान्स शिवाय पूर्ण होत नाहीत. अलीकडेच नोरा अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या 'थँक गॉड' चित्रपटात दिसली होती, ज्यामध्ये तिने 'मणिके..' हे खास गाणे केले होते. पण आता नोरा तिच्या फॅन्समुळे ट्रोल झाली आहे.

हेही वाचा: Box office:अमिताभच्या 'ऊंचाई'ने ऋषभ शेट्टीच्या कांताराला फोडला घाम, पहिल्याच दिवशी कमावले इतके करोड

नोराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिची फॅन् नोराला मिठी मारून मोठ्याने रडताना दिसत आहे.

नोरा फतेहीची एक चाहती तिला भेटण्यासाठी 'झलक दिखला जा 10' च्या सेटबाहेर पोहोचली, नोरा फतेहीला येथे पाहून ती फॅन ढसाढसा रडू लागली, ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. त्याच वेळी, नोराने तिला मिठी मारली आणि तिला समजावत तिला गप्प केले. तिनं चाहतीच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतले आणि तिच्याशी छान संवादही साधला. नोराचा हा स्वभाव चाहत्यांना खूप आवडला, तर काही लोक तिला ट्रोल करत आहेत.

हेही वाचा: Prashna: रशियात सुरु झाली मराठवाड्याची चर्चा, संतोष राम यांच्या 'प्रश्न' लघुपटानं जिंकून घेतलं...

सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून नोराला ट्रोल करत लोक प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'नोरा सेटवर ढसाढसा रडते , पण जेव्हा तिचे चाहते रडतात तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रूही येत नाही'. "नोरा तु पण नकली आणि तुझे चाहते पण नकली", ''नोरा तुझ्या बोलण्यात किती ड्रामा" इतकेच नव्हे तर तिची फॅन् पण ट्रोल झाली " किती ओव्हर अक्टिंग करते आहे " असे एकाने लिहिले. तर एकानं म्हटलं की, " ती रडत होती पण डोळ्यातनं पाण्याचा एक थेंब नाही"