Viral Video: मद्यधुंद अवस्थेत साराचा सुरक्षा रक्षकाला चुकीचा स्पर्श, नेटकरी भडकलेयत..Sara Ali Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video of Sara Ali Khan supposedly touching a security guard goes viral

Viral Video: मद्यधुंद अवस्थेत साराचा सुरक्षा रक्षकाला चुकीचा स्पर्श, नेटकरी भडकलेयत..

Sara Ali Khan Viral Video: बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान नेहमीच चर्चेत पहायला मिळते,पण यावेळी ती चर्चेत आहे ते काही फार चांगल्या गोष्टीमुळे नाही बरं का. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला पाहिल्यानंतर लोक भलतेच भडकले आहेत. सारानं दारुच्या नशेत धुंद होऊन एका सिक्युरिटी गार्डला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला आसा आरोप तिच्यावर केला जात आहे. आणि सोबत ज्या पुरुषांची काहीच चूक नसते अशांच्या सुरक्षेच्या प्रश्न उठवला गेला आहे.(Video of Sara Ali Khan supposedly touching a security guard goes viral)

हेही वाचा: 'हीच खरी क्वीन...' म्हणत चक्क कंगनानं पोस्ट केला 'त्या' बॉलीवूड अभिनेत्रीचा फोटो

या व्हिडीओत सारा अली खान एका मैत्रिणी सोबत दिसत आहे. तिनं तिचा हात हातात धरलेला आहे. ती मुंबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये शिरताना दिसत आहे. त्यांना पाहिल्यानंतर सिक्युरिटी गार्ड बाजूच्या भिंतीला एकदम चिटकून उभा राहतो,म्हणजे साराला तिथून रेस्टॉरंटमध्ये जायला काही अडचण येऊ नये. साराचे पाय तेव्हा थोडे लटपटतानाच दिसत आहेत. हे सगळं पाहिल्यावर लोकांचे म्हणणे पडतेय की सारा मद्यधुंद अवस्थेत दिसली,तसंच त्या सिक्युरिटी गार्डला एकदम चिटकून मुद्दामहून तिथून गेली आणि इतकंच नाही तर जाताना सिक्युरिटी गार्डला चुकीचा स्पर्श देखील केला तिनं.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोक खूपच भडकले आहेत. आणि साराच्या या चुकीच्या हरकतीवर प्रश्न देखील निर्माण करताना दिसले आहेत. ते ज्यांची काहीच चूक नाही अशा पुरुषांच्या बाजूनं उभे राहत त्यांच्या सुरक्षेवरनं प्रश्न निर्माण करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की जे साराने त्याच्यासोबत केले हे जर सिक्युरिटी गार्ड कडून चुकूनही झाले असते तर केवढा मोठा राडा घालण्यात आला असता,कदाचित त्या बिचाऱ्याची नोकरीही गेली असती. पण जर हेच चुकीचं कृत्य त्याच्यासोबत घडलं आहे तर मग त्याला पण न्याय मिळाला पाहिजे.

हेही वाचा: 'Mee Too नंतर मला अनेकदा मारण्याचा प्रयत्न..',तनुश्रीचा नाना पाटेकरांवर पुन्हा निशाणा

सारा अली खानला काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या कॉफी विथ करण ७ या चॅट शो मध्ये पाहिलं गेलं होतं. ती आपली मैत्रिण आणि अभिनेत्री जान्हवी कपूरसोबत शो मध्ये आली होती. दोघींनीही यावेळेस आपल्या पर्सनल लाइफविषयी मोठे खुलासे केले. साराने आपल्या एक्स-बॉयफ्रेंडचा उल्लेख करत कार्तिकचे नाव न घेता त्याला टोलाही लगावला. तसंच आता आपल्याला विजय देवरकोंडासोबत डेटवर जायला आवडेल असे देखील म्हणाली.

साराच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर तिला शेवटचं धनुष आणि अक्षय कुमारसोबत 'अतरंगी रे' मध्ये पाहिलं होतं. तिनं काही दिवसांपूर्वीच विक्की कौशल सोबतच्या सिनेमाचं शूटिंग उरकलं आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या सिनेमाचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. याव्यतिरिक्त विक्रांत मैसी सोबत ती 'गॅसलाइट' सिनेमाचं शूटिंगही करत होती.

सारा अली खानच्या पर्सनल लाईफविषयी देखील सध्या खूप चर्चा झालेली पहायला मिळतेय. तिचं नाव काही दिवसांपूर्वी क्रिकेटर शुभमन गिलसोबत जोडलं गेलं, जेव्हा त्याच्यासोबत तिचा डिनर एन्जॉय करतानाचा फोटो व्हायरल झाला होता.

Web Title: Video Of Sara Ali Khan Supposedly Touching A Security Guard Goes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..