OMG 2 Teaser Twitter Reaction: अक्षयचा OMG2 हिट होणार की फ्लॉप? टिझर येताच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा ट्विटरवर पुर

OMG 2 Teaser Review:
OMG 2 Teaser Review: Esakal

OMG 2 Teaser Review:  अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांचा आगामी चित्रपट OMG 2 चा टीझर 11 जुलै म्हणजेच आज रिलीज झाला आहे. श्रावणाच्या मुहूर्तांवर या सिनेमाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

गेल्या काही दिवसापासून सोशल मिडियावर या चित्रपटाची चर्चा होतीच. चित्रपटातील कलाकार अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम यांच्या लुकची सोशल मिडियावर चर्चा होती. मआत्र सर्वात जास्त लक्ष वेधलं ते अक्षय कुमारच्या लुकने.

OMG या सुपरहिट चित्रपटाचा OMG 2 हा पुढचा भाग आहे. टीझरच्या माध्यमातून निर्मात्यांनी चित्रपटाच्या चित्रपटाची झलक दाखवली आहे.

तथापि, मात्र हा टिझर पाहिल्यानंतर चित्रपचटाबाबत अधिक अंदाज लागत नसला तरी चित्रपटात अक्षय कुमारचा लूक आणि त्याचा दमदार संवाद नक्कीच लक्ष वेधत आहे.

आता या चित्रपटात आस्तिक भक्ताच्या मदतीला महादेव येणार असं टिझरमध्ये दिसत आहे. टिझर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांची उत्सुकता वाढली आहे.

मात्र टिझरमध्ये यामी गौतमी काही दिसलेली नाही. त्यामुळे यामीचे चाहते काहीसे नाराज आहेत. तर हा टिझर पाहिल्यानंतर आता नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यात सुरवात केली आहे. ट्विटवर OMG2 हा ट्रेंड करु लागलं आहे.

OMG 2 Teaser Review:
OMG 2 Teaser: आता नास्तिक नाय तर आस्तिक भक्ताची कहाणी! OMG 2 चा टिझर पाहून अंगावर येईल शहारा

या चित्रपटाचा टीझर रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांनी चित्रपटाच्या टिमला या चित्रपटातुन धार्मिक भावनाही दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेण्याची तंबीच दिली होती.

त्यानंतर टिझरमधुन धार्मिक भावना दुखावणार नाही याची भीती प्रेक्षकांच्या मनात होती. मात्र, व्हिडिओमध्ये तसं काहीच झालेलं नाही.

टीझर व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते खूपच खुश आहे. अक्षयच्या लुकने आणि टिझरने चाहते प्रभावित झाले. समीक्षक आणि सोशल मीडिया युजर्स चित्रपटाचं कौतुक करताना दिसले.

एकाने ट्विटरवर लिहिले की, मेकर्सनी OMG1 च्या काही क्लिप OMG2 च्या टीझरला जोडल्या हे खुप उत्तम काम केले आहे.

OMG 2 Teaser Review:
Ajith Kumar Cheating Row: 'माझ्याकडून पैसे घेऊन त्यानं...', निर्मात्यानं केला तामिळ सुपरस्टारवर गंभीर आरोप
OMG 2 Teaser Review:
Manali Floods Ruslan Mumtaz: मनालीच्या पुरात अभिनेता अडकला, डोळ्यासमोर रस्ता वाहून गेला, व्हिडीओ व्हायरल

एकानं याला 'रॉक सॉलिड टीझर' म्हटले आहे. एका व्यक्तीने लिहिले - अक्षय कुमारच्या एंट्रीने गूजबम्प्स दिलेत. तर एकानं नंदीबाबाच्या सीनचं कौतुक केले आहे. त्यामुळे या टिझरनंतर सोशल मिडियावर चित्रपटाबद्दल वातावरण हे सकारात्मक आहे.

काहींनी ट्रेन स्टेशन जवळचा सीन खुपच आवडला आहे. डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी यांची सर्जनशीलता खूप काही सांगून जाते असं एकानं म्हटलं आहे. तर काहींनी शाहरुखच्या जवान आणि अक्षयच्या OMG2 ची तुलना केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com