OMG 2 Trailer: 'आशीर्वाद नको पैसे द्या!' भगवान शंकरही झाले शॉक

Akshay Kumar Movie: OMG2 मध्ये अक्षयनं भगवान शंकराची साकारलेली भूमिका चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे.
OMG 2 Trailer Akshay Kumar Pankaj Tripathi
OMG 2 Trailer Akshay Kumar Pankaj Tripathi esakal

OMG 2 Trailer Akshay Kumar Pankaj Tripathi : ऑगस्ट महिना हा चाहत्यांसाठी आगळी मेजवानी ठरणार आहे. तब्बल चारपेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार, सनी देओल, आयुषमान खुराणा आणि पंकज त्रिपाठीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात सर्वाधिक चर्चा सनी देओलचा गदर आणि अक्षय कुमारच्या OMG2 होताना दिसते आहे.

आज अक्षय कुमारच्या ओह माय गॉड्च्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर समोर आला आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गदरच्या तुलनेत अक्षयच्या OMG2 चा ट्रेलर नेटकऱ्यांना आणखी प्रभावी वाटल्याचे त्यांच्या प्रतिक्रेतून दिसते आहे.

पंकज त्रिपाठी आणि अक्षय कुमार दुसऱ्यांदा OMG2 च्या निमित्तानं एकत्र आले आहेत. यापूर्वी बच्चन पांडेमध्ये अक्षय कुमार आणि पंकजनं प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.

OMG2 मध्ये अक्षयनं भगवान शंकराची साकारलेली भूमिका चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे. त्यातील एका प्रसंगामध्ये भगवान शंकराला भक्ताकडून वेगळ्याच उत्तराचा सामना करावा लागतो असे दिसून येते. सोशल मीडियावर तो व्हिडिओ चर्चेत आला आहे. काहींनी तो प्रसंग आवडला असून त्यासाठी लेखक आणि दिग्दर्शक यांचे कौतूक केले आहे. OMG च्या पहिल्या भागात प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनी देखील आपल्या भूमिकेनं आणि संवादानं प्रेक्षकांना जिंकून घेतले होते.

गेल्या काही दिवसांपासून OMG2 च्या ट्रेलरची चर्चा होती. आता तो व्हायरल झाला असून त्यावर प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. ओमएजी २ च्या कथेविषयी बोलायचे झाल्यास त्यामध्ये कांती शरण मुद्गलची कथा सांगण्यात आली आहे.

त्यानं कोर्टामध्ये मुलाच्या संरक्षणासाठी याचिका दाखल केली आहे. त्यात वादी आणि प्रतिवादी तोच आहे. अशावेळी होणारा संघर्ष, त्यातील गमतीजमती दिग्दर्शकानं ओएमजीमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

OMG 2 Trailer Akshay Kumar Pankaj Tripathi
Unaad Review : तरुणाईला 'मार्गदर्शक' ठरेल अशी कलाकृती!

विनोदाची पखरण करत एका गंभीर विषयाची मांडणी करण्याचे काम ओएमजीमधून करण्यात आले आहे. ओएमजीच्या पहिल्या भागामध्ये आस्तिक आणि नास्तिक असा संघर्ष दाखवण्यात आला होता.

त्यात कांजीलाल हा चक्क देवाविरोधातच कोर्टामध्ये धाव घेतो. त्या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याला मोठा प्रतिसादही मिळाला होता. आता प्रेक्षकांना ओएमजीच्या दुसऱ्या भागाचे वेध लागले आहेत.

OMG 2 Trailer Akshay Kumar Pankaj Tripathi
Nitin Desai Death: नितीन देसाई यांचा मृत्यू कशामुळे झाला? पोस्टमार्टमचा अहवाल आला समोर

ओएमजी २ मध्ये कांतीलालची भूमिका पंकज त्रिपाठीनं केली आहे. गेल्या भागात ती भूमिका परेश रावल यांनी साकारली होती.

पहिल्या भागात अक्षय कुमारनं भगवान श्रीकृष्णाची तर आताच्या चित्रपटात भगवान शंकाराची भूमिका साकारली आहे. ट्रेलरमधील अक्षयचा लूक हा चाहत्यांना आवडला असून त्यांनी बॉलीवूच्या खिलाडीचे कौतूक केले आहे.

अक्षय कुमारचा ओएमजी २ येत्या अकरा ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर एका युझर्सनं लिहिलं आहे की, अक्षयच्या या चित्रपटाचा ट्रेलर खूपच मनोरंजक आहे. त्यात वेगळी कथा पुन्हा प्रभावीपणे आपल्या समोर येणार आहे. त्या चित्रपटाची खूप उत्सूकता आहे. अक्षयचा हा चित्रपट कमाल करेल यात शंका नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com