ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर मराठी चित्रपटांना डिमांडच नाही; वाचा काय आहेत कारणे...

संतोष भिंगार्डे : सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 28 जून 2020

मराठीत प्रदर्शित झालेले आणि गाजलेले चित्रपट ते घेतात. शिवाय ते शेअरवर चित्रपट मागतात आणि एका मिनिटाला तीन ते पाच रुपये असा दर देतात. त्यामध्ये आपलेच नुकसान होते. एक ते तीन वर्षांचा तो करार असतो आणि त्यामध्ये निर्मात्याने गुंतवलेली रक्कम वसूल होत नाही.

मुंबई : हिंदी तसेच दक्षिणेतील अनेक चित्रपट एकापाठोपाठ एक ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. मराठीमध्येही तीस ते पस्तीस चित्रपट तयार आहेत. त्यापैकी काही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतील असे वाटलेले होते. परंतु मराठी चित्रपटांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर म्हणावा तसा डिमांड नाही. मराठी चित्रपटांना तेथे म्हणावी तशी किंमत मिळत नाही. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता धूसर आहे.

पुनःश्च हरिओम.. मुंबईकरांनो, दोन किलोमीटरपुढे जाऊ नका; वाचा कोणी केलंय आवाहन

कोरोनामुळे देशातील सर्वच चित्रपटगृहे गेले साडेतीन महिने बंद आहेत. त्यांचा पडदा कधी उघडेल हे काही सांगता येत नाही. हिंदीसह मराठीतील अनेक निर्मात्याचे तसेच दिग्दर्शकांचे चित्रपट तयार आहेत. या चित्रपटांवर निर्मात्यांनी लाखो-करोडो रुपये लावलेले आहेत. हिंदी तसेच दक्षिणेतील प्रॉडक्शन कंपन्यांनी आपले काही चित्रपट भरभक्कम रकमेला ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिले. मात्र मराठी चित्रपटांबद्दल काय..असा प्रश्न निर्माण झाला होता. 

सकाळ IMPACT: आच्छाड तपासणी नाका प्रकरणात चौकशीचे आदेश; परिवहन विभागात मोठी खळबळ...

मराठी प्रदर्शित न झालेले चित्रपटदेखील ओटीटीवर जातील, असे वाटलेले होते. काही निर्मात्यांचे पैसे प्रोजेक्टवर अडकल्यामुळे त्यांना ओटीटीकडून चांगली किंमत मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु ती अपेक्षा फोल ठरली आहे. ओटीटीवर मराठी चित्रपटांना फारशी मागणी नसल्याचे समजते आहे. त्यामुळे आता थिएटर्स कधी सुरू होणार याकडे मराठीचे डोळे लागलेले आहेत. याबाबत पिकल एन्टरटेन्मेंटचे समीर दीक्षित म्हणाले, की ओटीटीवर हिंदी तसेच दक्षिणेच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो. या चित्रपटांमुळे ओटीटी कंपन्यांच्या सबक्रायबर्सच्या संख्येत वाढ होते. मराठीच्या बाबतीत ते होत नाही. ओटीटीवर मराठी चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे ते प्रदर्शित न झालेले चित्रपट सरसकट रक्कम देऊन घेत नाहीत. 

कोरोनावर उपचाराची ट्रेनिंग घेतली 1 लाख डॉक्टरांनी, नोंदणी फक्त 1500 जणांची...

मराठीत प्रदर्शित झालेले आणि गाजलेले चित्रपट ते घेतात. शिवाय ते शेअरवर चित्रपट मागतात आणि एका मिनिटाला तीन ते पाच रुपये असा दर देतात. त्यामध्ये आपलेच नुकसान होते. एक ते तीन वर्षांचा तो करार असतो आणि त्यामध्ये निर्मात्याने गुंतवलेली रक्कम वसूल होत नाही. शिवाय प्रदर्शित न झालेला चित्रपट सरसकट ओटीटीला दिला तर सॅटेलाईट कंपन्या चित्रपट घेत नाहीत. त्यांचे म्हणणे असे असते की ओटीटीला दिला आमच्याकडे कोण पाहणार. त्यामुळे खूप कठीण परिस्थिती आहे.

1 जुलैपासून मुंबईत काय असेल, लॉकडाऊन की अनलॉक 2?...असा असू शकेल अनलॉक-2

निर्माता आकाश पेंढारकर म्हणाला, की माझे 'दे धक्का 2', 'अनन्या', 'जागो मोहन प्यारे' असे अनेक चांगले चित्रपट तयार आहेत. मी हे चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित करणार आहे. कारण मी ओटीटी प्लॅटफॉर्मवर गेलो होतो. पण ते सध्या कुठलाही रिजनल सिनेमा घेत नाहीत. कारण त्यांच्याकडील बजेट आता संपलेले आहे. माझ्या 'अनन्या' चित्रपटाला एका ओटीटीची ऑफर हौती. पण कुठल्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवर मराठीला म्हणावी तशी किंमत मिळत नाही. गुंतवलेले पैसेदेखील ओटीटीवर मिळत नाहीत.  

सावध व्हा, मुंबईत कोरोनानंतर मुलांना 'या' आजाराची लागण... 

चित्रपटांचे वेबसिरिजमध्ये रुपांतर अशक्य
ओटीटी कंपन्या मराठी चित्रपटाचे वेबसीरीजमध्ये रूपांतर करा, असे सांगतात. कारण मराठी चित्रपटापेक्षा वेबसीरीजला त्यांच्याकडे चांगले बजेट असते. त्यामुळे एका चित्रपटाचे पाच ते सहा भाग करा आणि द्या, असे ते सांगतात. काही चित्रपटांच्या बाबतीत ते शक्य होईल; परंतु सगळ्याच चित्रपटांच्या बाबतीत ते शक्य होणार नाही, असे प्रसिद्ध् वितरक समीर दीक्षित म्हणाले.

आमचे दे धक्का २, अनन्या, जागो मोहन प्यारे असे आठेक चांगले चित्रपट तयार आहेत. आम्ही हे चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित करणार आहोत.
कारणआम्ही ओटीटी प्लॅटफाॅर्मवर गेलो होतो. पण ते सध्या कुठलाही रिजनल सिनेमा घेत नाहीत. कारण त्यांच्याकडील बजेट आता संपलेले आहे. आमच्या अनन्या चित्रपटाला एका ओटीटी प्लॅटफार्मची आॅफर हौती. पण कुठल्याही ओटीटी प्लॅटफाॅर्मवर मराठीला म्हणावी तशी किंमत मिळत नाही. गुंतवलेले पैसेदेखील ओटीटीवर मिळत नाहीत.  

​-आकाश पेंढारकर,निर्माता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: OTT channel are not ready to accept marathi regional movies due no budget