Ranbir Kapoor Duplicate: पाकिस्तानात रणबीरचा डुप्लिकेट! त्याच्या गाण्यावर अभिनेत्याचा डान्स Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranbir Kapoor Duplicate

Ranbir Kapoor Duplicate: पाकिस्तानात रणबीरचा डुप्लिकेट! त्याच्या गाण्यावर अभिनेत्याचा डान्स Video Viral

सध्या पाकिस्तानी कलाकारांना भारतीय गाण्यावर थिरकतांनाचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपुर्वी पाकिस्तानी गायकाचा लता दिदी याच्या ये समां या गाण्यावरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

त्याचबरोबर पाकिस्तानी अभिनेत्री हानियाचा ही नाटू नाटू वरिल डान्स सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला. आता त्यातच पुन्हा एका अभिनेत्यांचा रणबीर कपुरच्या तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटातील गाण्यावरचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

पाकिस्तानी अभिनेता हम्माद शोएब 'प्यार होता कई बार है' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हे गाणे रणबीर कपूरवर चित्रित करण्यात आले असून ते अरिजित सिंह आणि चरण यांनी गायले आहे.

या व्हिडिओमध्ये हम्माद शोएब गाण्यावर नाचताना दिसत आहे. त्याने काळ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला आहे. तो कुणाच्यातरी लग्नात डान्स करत आहे. हा व्हिडिओ 24 फेब्रुवारीला शेअर करण्यात आला होता.

पोस्ट केल्यापासून ते 2.2 दशलक्ष वेळा पाहिले गेले आहे. या क्लिपवर अनेक लाइक्स आणि कमेंट्स देखील आहेत. मात्र आता हा व्हिडिओ लोकांच्या नजरेत आला आणि मग काय नेटकऱ्यांनी या व्हिडिओला व्हायरल केलं आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एक म्हणाला की तु ९५% रणबीरसारखा दिसत आहेस तर एक म्हणाला की हा तर पाकिस्तानचा रणबीर तर काही नेटकऱ्यांनी म्हटलंय की तो रणबीरसारखा दिसतोय! छान नाचतोय.

याआधी हम्मादने शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवरही डान्स केला आहे. त्याची क्लिपही त्याने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. इतकंच नाही तर तो हृतिक रोशनच्या 'घुंगरू' गाण्यावरही नाचतांना तो दिसला.

काही दिवसांपुर्वी हानियाचाही डान्स व्हिडिओ व्हायरल झाला होता. तिने लग्नात पाहुण्यांसमोर डान्स करून सर्वांची मनं जिंकली.सोशल मीडियावर अनेक लोक हानियाच्या डान्स परफॉर्मन्सचे कौतुक करत होते.