Pandit Birju Maharaj: माधुरी, दीपिकाला दिले नृत्याचे धडे

प्रसिद्ध नर्तक पंडित बिरजु महाराज यांचा हदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते 83 वर्षांचे होते.
madhuri Dixit and deepika padukon
madhuri Dixit and deepika padukon

pandit birju maharaj : प्रसिद्ध नर्तक पंडित बिरजु महाराज यांचा हदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते 83 वर्षांचे होते. (Pandit Birju Maharaj Passed Away) त्यांना देशातल्या मानाच्या पद्मविभुषण (Padmavibhushan) पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. रविवारी पहाटे सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. बिरजु महाराजांच्या (Biraju Maharaj) जाण्यानं संगीत क्षेत्रातील अनेक चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. भारतीय शास्त्रीय नृत्यामध्ये मोठी कामगिरी करणाऱ्यांमध्ये पंडित बिरजु महाराज यांचं नाव मोठं होतं. त्यांना परदेशामध्ये देखील वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी (Bollywood Celebrity) त्यांना आदरांजली वाहिली आहे. यासगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित (Bollywood actress Madhuri Dixit) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukon) यांनी बिरजु महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

बिरजु महाराज (Birju Maharaj) यांनी बॉलीवूडमधील काही चित्रपटांसाठी नृत्यदिग्दर्शन (Choreographer) केले होते. त्यामुळे बॉलीवूडमधल्या अनेक अभिनेत्रींच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली. त्यांना प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळाले. त्यामध्ये माधुरी दीक्षित आणि दीपिका पादुकोण यांच्या नावाचा समावेश करावा लागेल. कथ्थक या नृत्यप्रकाराला वेगळी ओळख त्यांनी दिली. बिरजु महाराज यांचा जन्म लखनऊ घराण्यातील अच्छन महाराजांच्या घरी झाला. त्यांनी आपले काका लच्छु महाराज आणि शंभु महाराज यांच्याकडून कथ्थकाचे धडे घेतले. बिरजु महाराज यांनी सत्यजित रे यांच्या शतरंज के खिलाडी मध्ये दोन गाण्यांसाठी नृत्यदिग्दर्शन केले होते. यासोबत त्यांनी आपला आवाजही या चित्रपटासाठी दिला होता.

madhuri Dixit and deepika padukon
इन्स्टाग्रामवर 'देसी गर्ल'चीच चर्चा; दीपिका-कतरिनालाही टाकलं मागे

याशिवाय संजय लीला भन्साळी यांच्या देवदास या चित्रपटातील काहे छेड मोहे या गाण्यासाठी त्यांनी कोरिओग्राफी केली होती. या गाण्यामध्ये माधुरीनं डान्स केला होता. तिच्या डान्सनं प्रेक्षकांना वेड लावले होते. माधुरी नेहमीच ही चाहत्यांच्या आवडीची नृत्यांगणा राहिली आहे. मात्र त्यामागे तिच्या नृत्यदिग्दर्शकांचा मोठा वाटा आहे. हे विसरता येणार आहे. बाजीराव मस्तानीमध्ये दीपिकानं मोहे रंग दो लाल या गाण्यावर जो डान्स केला होता त्याची कोरिओग्राफी बिरजु महाराजांनी केली होती. माधुरीनं बिरजु महाराजांच्य जाण्यावर शोक व्यक्त केला आहे. माझे गुरु, मित्र मी आता गमावले आहे. असे तिनं म्हटलं आहे.

madhuri Dixit and deepika padukon
शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हे ते सनी देओल भडकला; महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com