शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हे ते सनी देओल भडकला; महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

टीम-ईसकाळ
Wednesday, 27 January 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाप्रकरणी मोठं वक्तव्य केलं आहे. विदेशात अमेरिकेत भारतीय दुतावासासमोर खलिस्तानी झेंडे फडकवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

शेतकरी आंदोलनाप्रकरणी वातावरण तापलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक सुरु असून शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागाप्रकरणी मोठं वक्तव्य केलं आहे. विदेशात अमेरिकेत भारतीय दुतावासासमोर खलिस्तानी झेंडे फडकवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी नेमलेल्या उच्चाधिकार समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : 'बड्डे लोगों की बड्डी-बड्डी बातें' असं म्हणतात ते काही उगीच नाही. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून एलॉन मस्कला ओळखलं जातं. जगातील सर्वांत मोठी इलेक्ट्रीक वाहन कंपनीचा मस्क हा मालक आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : दिल्ली हिंसाचारप्रकरणी मोठी बातमी हाती येत आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच याचिका दाखल करण्यात आली आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : AIADMK मधून हकालपट्टी झालेल्या नेत्या शशिकला यांची बेंगळुरु तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. चार वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर बुधवारी त्यांची सुटका करण्यात आली. सविस्तर वाचा

हैद्राबाद : अंधश्रद्धेतून सुशिक्षित आई-वडिलांनी आपल्या पोटच्या दोन मुलींची घृणास्पदरित्या हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या रविवारी समोर आला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सतयुग सुरु होणार आहे. सविस्तर वाचा

मुंबई : भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. काल दिल्लीत झालेल्या हिंसक शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : 26 जानेवारीला झालेल्या प्रजासत्ताक दिनाला हिंसाचाराचे गालबोट लागले. शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात आयोजित केलेली ट्रॅक्टर परेड आपला निर्धारित मार्ग सोडून दिल्लीत शिरली आणि हिंसाचाराच्या घटना समोर येऊ लागल्या. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे नवे 12,689 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 1,06,89,527 वर पोहोचली आहे. सविस्तर वाचा

वॉशिंग्टन : खलिस्तान समर्थकांनी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने भारत सरकारद्वारे भारतात लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना मागे घेण्याची मागणी केली. सविस्तर वाचा

पुणे : पुण्यातील डेक्कन परिसरातील आपटे प्रशालेला आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी भेट दिली. पुणे शहरात सध्या 9 ते 12 वीचे वर्ग सुरु झाले आहेत. यापैकी 10 वीच्या वर्गांना वर्षा गायकवाड यांनी भेट दिली. सविस्तर वाचा

मुंबई : बाॅलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता सनी देओल हा त्याच्या रागीट स्वभावामुळे प्रसिध्द आहे. त्याच्या बहुतांशी चित्रपटांमध्ये त्यानं केलेल्या भूमिका या कमालीच्या रागीट वृत्तीच्या आहेत. अन्यायाविरोधात लढताना सनीचा अभिनय सर्वांनी पडद्यावर पाहिला आहे. सविस्तर वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest marathi news farmer protest sunny deol amit shah uddhav thackeray delhi