पावनखिंड चित्रपटात कोण होणार 'बाजीप्रभू'?

टीम-ईसकाळ
Wednesday, 27 January 2021

पावनखिंडच्या पोस्टरमध्ये बाजीप्रभू पावनखिंडीत तलवार घेऊन उभे असलेले दिसत आहे. या चित्रपटाच्या शुटींगला लवकरच सुरुवात होणार आहे. या  चित्रपटात कोणकोणते कलाकार दिसणार आहेत याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती.

मुंबई - पानिपत, फत्तेशिकस्त, फर्जंद, तान्हाजी या ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. असाच एक ऐतिहासिक चित्रपट लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आणि डॅा.काशिनाथ घाणेकर' या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर  दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांच्या पावनखिंड या नवीन चित्रपटाची  घोषणा झाली आहे.  

Happy birthday bobby deol; 'आश्रममध्ये 'बाबा' होऊन 'हिरो' झाला'

2019 मध्ये अभिजित देशपांडे यांनी या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केले होते. त्यावेळी नेटकऱ्याने ट्विटच्या माध्यमातून या चित्रपटात संजय दत्तला बाजीप्रभू यांच्या भूमिकेसाठी कास्ट करण्याची विनंती केली होती. त्याच्यावर अभिजीतने ओके अशी प्रतिक्रिया दिली. यावरुन पावनखिंडमध्ये संजय दत्त मुख्य भूमिकेत झळकणार अशी चर्चा सुरू झाली. पण नंतर याबाबत या चित्रपटाच्या टीमने कोणताच खुलासा केला नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

सनी चिडला,लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला; तुझा माझा संबंध संपला'

पावनखिंडच्या पोस्टरमध्ये बाजीप्रभू पावनखिंडीत तलवार घेऊन उभे असलेले दिसत आहे. या चित्रपटाच्या शुटींगला लवकरच सुरुवात होणार आहे. या  चित्रपटात कोणकोणते कलाकार दिसणार आहेत याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. मराठी  चित्रपट सृष्टीतील अभिनेता सुबोध भावे या चित्रपटात बाजीप्रभुंची भूमिका साकारणार अशी चर्चा सुरु आहे. सुबोधनं नुकताच दिग्दर्शक अभिजित देशपांडे सोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला. या फोटोला सुबोधने'अभ्या मित्रा आजपासून सुरु होणाऱ्या आपल्या नव्या अध्यायासाठी तुला आणि आपल्या संपूर्ण संघाला खुप  खुप शुभेच्छा' असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टमुळे सुबोध पावनखिंडमध्ये दिसणार आहे अशी सध्या चर्चा सूरु आहे. 

'शेतक-यांविषयी बोलली,घे मग; 6 जाहिरात कंपन्यांचा कंगणाला धडा'

काही दिवसांपूर्वी सुबोध भावे आणि शरद केळकरने घोडेस्वारी आणि लाठी काठीच्या सरावाचा व्हिडियो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे सुबोध आणि शरद यांची जोडी 'पावनखिंड' या  चित्रपटात दिसेल अशी चर्चा सुरु सोशल मीडियावर सुरु आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pavankhind marathi movie actor subodh bhave sharad kelkar