esakal | 'त्यांचे माझे डोळे सारखेच', म्हणून साकारला 'सिक्रेट्स ऑफ लव'
sakal

बोलून बातमी शोधा

politician actor ravi kishan interview talks about playing osho in biographical movie

लॉकडाऊनच्या अगोदर ओशो यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची शुटिंग पूर्ण करण्यात आली होती.

'त्यांचे माझे डोळे सारखेच', म्हणून साकारला 'सिक्रेट्स ऑफ लव'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कुठलीही भूमिका साकारायची तर त्याचा मुळापासून अभ्यास करण्याची गरज आहे. केवळ आपल्या वाट्याला ती भूमिका आली म्हणून ती साकारल्यास प्रेक्षकांच्या पसंतीस पडतेच असे नाही. त्यामुळे संबंधित त्या भूमिकेचा सर्वांगीण दृष्टीने विचार महत्वाचा आहे. जगप्रसिध्द विचारवंत ओशो अर्थात आचार्य रजनीश यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यांची भूमिका साकारणा-या एका प्रसिध्द कलावंतांने त्यामागील काही अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर केले आहेत.

केवळ भोजपूरी चित्रपटांमध्ये रविकिशन यांचे नाव प्रसिध्द आहे असे नाही तर बॉलीवूडमध्ये त्यांनी आपल्या कामानं ठसा उमटविला आहे. अशावेळी आता ते एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. याविषयी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रविकिशन यांनी सांगितले की, दिग्दर्शकानं ज्यावेळी ऑडिशनसाठी बोलावले होते तेव्हा त्याच्या दृष्टीनं मी त्या भूमिकेत योग्य होतो असे त्यांचे मत होते. त्यानंतर मी त्या जगप्रसिध्द विचारवंत ओशोंच्या साहित्याकडे वळलो. त्यात जेवढ जमेल तेवढे वाचले. त्यांचे विचार पचवणे सोपे नाही. ओशो हे त्यांच्या वादग्रस्त विचारांसाठी प्रसिध्द होते.

रविकिशन हे सध्या गोरखपूर चे खासदार म्हणून ते संसदेत काम पाहत आहेत. तसेच बंगालमधील निवडणूकांमध्येही त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. त्यांचा ओशो यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यांनी याविषयी सांगितले की, "सीक्रेट्स ऑफ लव" मध्ये मी ओशो यांची भूमिका साकारत आहे. मी साकारत असलेली त्यांची भूमिका आणि माझे वैयक्तिक आयुष्य याची कृपया करुन गल्लत करुन घेऊ नका. ओशो यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणे मोठे आव्हानात्मक काम आहे. मी फार काही त्यांचे साहित्य वाचलेलं नाही. मात्र या चित्रपटाच्या निमित्तानं ते वाचावं लागलं. 

क्या बात है मेनन साब, दादासाहेब फाळके पुरस्कार आपके नाम

ज्येष्ठ गीतकाराच्या मदतीला नेहा धावली; 5 लाखांची केली मदत

लॉकडाऊनच्या अगोदर ओशो यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची शुटिंग पूर्ण करण्यात आली होती. त्यावेळी मी त्यांच्याविषयी जेवढं ऐकलं आणि वाचलं त्यावरुन भूमिका साकारली आहे. कुठलीही भूमिका साकारायची म्हणजे त्याची पूर्ण माहिती जाणून घेणे कलाकारासाठी महत्वाचे आहे असे मला वाटते. ज्यावेळी मी माझ्या दिग्दर्शकाला मला ही भूमिका करण्यासाठी का निवडले असे विचारले तेव्हा त्यानं मला असे उत्तर दिले की, ओशोंचे आणि माझे डोळे हे सारखेच आहेत. त्यामुळे मला हा रोल ऑफर झाला.