esakal | प्रसिद्ध बंगाली अभिनेत्रीला कोरोना; कुटुंबीयांना देखील झाली बाधा...

बोलून बातमी शोधा

koyal mallik

हिंदी चित्रपटसृष्टीत तसेच दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत कोरोनाने शिरकाव केला आहे. निर्माते बोनी कपूर तसेच करण जोहर यांच्या घरातील नोकरांना कोरोनाची बाधा झाली होती. आता त्यांनी कोरोनावर मात केली आहे. पण त्यानंतर आता कोरोनाने बंगाली चित्रपटसृष्टीत शिरकाव केला आहे.

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्रीला कोरोना; कुटुंबीयांना देखील झाली बाधा...
sakal_logo
By
संतोष भिंगार्डे

मुंबई : कोरोना महामारीने जगभर हाहाकार माजविला आहे. काही देशांमध्ये कोरोना आटोक्यात आला असला तरी भारतात अजूनही त्याने ठाण मांडलेले आहे. काही राज्यांमध्ये त्यामुळे लॉकडाऊन सुरू आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत तसेच दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत कोरोनाने शिरकाव केला आहे. निर्माते बोनी कपूर तसेच करण जोहर यांच्या घरातील नोकरांना कोरोनाची बाधा झाली होती. आता त्यांनी कोरोनावर मात केली आहे. पण त्यानंतर आता कोरोनाने बंगाली चित्रपटसृष्टीत शिरकाव केला आहे. बंगाली अभिनेत्री कोयल मल्लिक आणि तिच्या कुटुंबीयांना कोरोना झाला आहे.

विकास दुबे चकमकीवर चित्रपट? मनोज वाजपेयी साकारणार भूमिका ?

कोयल मल्लिक ही बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या वडिलांनी म्हणजेच रणजित मल्लिक यांनी एकेकाळी बंगाली चित्रपटसृष्टी गाजविली आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. कोयलने प्रसन्नोजित चॅटर्जी, देव तसेच मिथुन चक्रवर्ती अशा मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम केले आहे. निश्पल राणे हा तिचा पती आहे. व्यवसायाने तो चित्रपट निर्माता आहे. कोयलला दोन महिन्यांची मुलगी आहे. 

आयसीएसई मंडळाचा निकाल जाहीर; गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकालात झाली...

कोयलने आपल्याला तसेच कुटुंबीयांना कोरोना झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. ती तसेच तिचा पती, वडील आणि आई आमची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, असे तिने सांगितले आहे. सध्या त्यांना त्यांच्याच घरी क्वारंटाईन करण्यात आले आहे. डॉक्टरांचे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

---
संपादन : ऋषिराज तायडे