प्रतीक सहजपालचं चक्क के-पॉप सेन्सेशन Aora बरोबर कोलॅब! चाहते उत्सूक..Pratik Sehajpal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pratik Sehajpal and K-Pop Singer Aoora

Pratik Sehajpal: प्रतीक सहजपालचं चक्क के-पॉप सेन्सेशन Aora बरोबर कोलॅब! चाहते उत्सूक..

बिग बॉस आटोटीच्या प्लॅटफॉर्मवरुन प्रसिद्धीच्या झोतात आलेला चेहरा प्रतीक सहजपाल सध्या चांगलाच चर्चेत आहे. आता कोरियन पॉप स्टार आओरासोबत धमाकेदार प्रोजेक्ट करण्याच्या तयारीत आहे.

के-पॉप हे त्यांच्या हटके याच्या बीट्स, मनमोहक नृत्यदिग्दर्शन आणि फॅन्डम्ससाठी ओळखले जाते. के पॉप हे सध्या जागतिक संगीतला एक अनोखं स्थान प्रस्थापित करून देत आहे. दक्षिण कोरियाच्या सांस्कृतिक अविभाज्य घटक असलेल्या के पॉपच्या सर्वदूर होते. भारतात तर ते कमालिचे लोकप्रिय आहेत.

के-पॉप फ्युजन आता सगळ्यांना अनुभवयाला मिळणार आहे कारण अभिनेता प्रतीक सहजपाल के-पॉप सेन्सेशन आओरासोबत (K-Pop Singer Aoora) एक भन्नाट कोलॅब करणार असल्याच्या चर्चा आहेत.

प्रतिक सहजपाल लिखित आणि दिग्दर्शित हा खास प्रोजेक्ट् नक्कीच काहीतरी वेगळं असणार आहे. के-पॉप चा अनोखा उत्साह आता भारतीयांना देखील अनुभवयाला मिळणार आहे.

भारतीय आणि कोरियन प्रेक्षकांना एकत्र येऊन काहीतरी वेगळा प्रयोग यातून अनुभवता येणार आहे. प्रतीक सहजपालच्या Aora सोबतच्या या खास प्रोजेक्ट च्या घोषणेने चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीत चर्चा सुरु झाली असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतीकने या टीझर ची एक झलक सोशल मीडिया वर शेअर करत ही खास गोष्ट आपल्या फॅन्स सोबत शेयर केली. " Let it begin " असं कॅप्शन देत ही आनंदाची बातमी त्यानं चाहत्यांसोबत शेयर केली आहे.

हा प्रोजेक्ट नक्कीच खुपच मनोरंजक असणार यात काही शंका नाही. प्रतीक सहजपाल आणि Aora यांच्या कलांची अनोखी सांगड यातून अनुभवयाला मिळणार असून सगळेच या साठी उत्सुक आहेत.

के-पॉप सोबतचा प्रतीक चा हा अनोखा प्रोजेक्ट नक्कीच चाहत्यांच्या मनात उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. कारण प्रतीक सहजपाल आणि आओरा यांच्या कलांची अनोखी सांगड यातून अनुभवयाला मिळणार असून दोघांचे चाहते यासाठी उत्सुक असतील.

प्रतीक सेहजपाल आणि आओरा हे दोघे यातून सांस्कृतिक देवाणघेवाण करणार असून एका नव्या उत्साहात हा प्रोजेक्ट करून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत.

प्रतिक सहजपाल यांचा जन्म 12 मे 1993 रोजी दिल्लीत झाला. त्यांचे शालेय शिक्षणही येथूनच झाले. प्रतीकने एमिटी लॉ स्कूलमधून कायद्याचे शिक्षण घेतले आहे.

2018 मध्ये MTV च्या लव्ह स्कूल सीझन 3 मधून प्रतीकला ओळख मिळाली. त्याच वर्षी त्याने एमटीव्ही रोडीजसाठी ऑडिशन देखील दिले परंतु फिटनेस टास्कनंतर तो बाहेर पडला. प्रतीक सहजपालने एकता कपूरच्या 'बेबाकी' या वेब शोमध्येही काम केले होते.