Ileana D'Cruz
Ileana D'CruzEsakal

Ileana D'Cruz: 'त्याने माझे माझे अश्रू पुसले..', लग्नाशिवाय आई होणाऱ्या इलियानानं अखेर दाखवला प्रियकराचा फोटो..

Published on

आजकाल इलियाना डिक्रूझ तिच्या आयुष्यातील सर्वात खास टप्पा एन्जॉय करत आहे. तिने वर्षाच्या सुरुवातीला तिच्या गरोदरपणाची गोड बातमी चाहत्यांसोबत शेयर केली होती.

त्यानंतर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी तिचे अभिनंदन केले. ती नेहमी तिच्या आयुष्यातल्या या खास क्षणांची फोटो चाहत्यासोबतस शेयर करण्याची एकही संधी सोडत नाही.

मात्र आजपर्यंत इलियानाने तिचा प्रियकर किंवा जोडीदार कोण आहे खुलासा केलेला नाही. अनेकांनी तिला मुलाच्या वडिलांबाबतही प्रश्न विचारले होता.

तिने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे तिला बऱ्याचवेळा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.

(Ileana D'Cruz bollywood actress Mom-To-Be shares first photo with boyfriend )

 Ileana D'Cruz
Adipurush Advance Booking: किसिंग प्रकरणातनंतरही रिलिजपुर्वीच आदिपुरुषचा रेकॉर्ड! 'KGF चॅप्टर 2'ला टाकलं मागं..

लग्नाशिवाय आई होणारमुळे लोकांनी तिला ट्रोल केले. मात्र आता इलियानाने पहिल्यांदाच बॉयफ्रेंडची झलक दाखवली आहे. या फोटोसोबत तिने तिच्या जोडीदाराचं कौतुक करणारी पोस्टही लिहिली आहे.

इलियानाने इंस्टाग्रामवर तिच्या मिस्ट्री मॅनसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर लगेचच हा फोटो अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडचा असावा अशी चर्चा सुरू झाली.

याआधीही इलियानाने तिच्या बॉयफ्रेंडचा हात धरलेला फोटो टाकला होता. ज्यामध्ये ती तिची अंगठी फ्लॉंट करताना दिसली होती.

या फोटोवरून त्यांची एंगेजमेंट झाल्याची चर्चा सुरू झाली होती.

 Ileana D'Cruz
Mike Batayeh: वयाच्या ५२ व्या वर्षी 'ब्रेकींग बॅड' फेम या प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन

एक अस्पष्ट मोनोक्रोम फोटो शेअर इलियानानं लांबलचक नोट शेयर केली आहे. त्यात ती म्हणते की, " बाळाला जन्म देणे हा खूप सुंदर आशीर्वाद आहे... मला कधीच वाटलं नव्हतं की मी हा अनुभव घेऊ शकेन. पण या प्रवासासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते."

माझ्या आत वाढत असणाऱ्या छोट्याशा जीवाला अनुभवणं किती सुंदर आहे हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. बऱ्याच वेळा मी माझ्या बेबी बंपला पाहून भारावून जाते.

मी लवकरच तुला भेटणार आहे. काही दिवस असेही असतात जे खुप कठीण असतात. म्हणूनच मी प्रयत्न करत आहे. काही वेळा दु:खी आणि काही गोष्टी हताश वाटतात. बऱ्याच वेळा डोळ्यात अश्रू असतात आणि त्यासोबत अपराधीपणाची भावना येते.

 Ileana D'Cruz
Sri Ganeshan passed away: भरतनाट्यम गुरु श्री गणेशन यांचे निधन, मंचावरच सोडला जीव..

पण माझे मन मला सांगते की मी कृतज्ञ असले पाहिजे, म्हणून छोट्या छोट्या गोष्टींवर रडलं नाही पाहिजे. आणि खंबीर व्हायला हवं.

कारण जर मी मजबूत झाले नाही मग मी कशा प्रकारची आई होईल. मला फक्त एवढेच माहित आहे की मला बाळावर खूप प्रेम आहे. आणि आत्ता मला वाटतं की हे पुरेसे आहे.

अभिनेत्रीने तिच्या बॉयफ्रेंडचे कौतुक करताना पुढे लिहिले,'..आणि ज्या दिवशी मी स्वत:सोबत दयाळूपणे वागत नाही तेव्हा हा प्रेमळ व्यक्ती माझ्यासोबत उभा असतो.

तो माझा आधार झाला ज्यावेळी मी तुटणार होते आणि माझे अश्रू पुसले. मला हसवण्यासाठी वाईट जोक करतो.

किंवा मला मिठी मारतो कारण त्याला माहित असतं की त्यावेळी मला त्याची गरज असते. यामुळे आता सर्व काही अवघड वाटत नाही.'

 Ileana D'Cruz
Priyanka Chopra New Look: प्रियांकाची झलक सगळ्यात अलग! भारत असो वा इटली चर्चा तर होणारच..

आता इलियानाची ही पोस्ट व्हायरल होत आहे. तिने या पोस्टमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या. मात्र अजूनही त्या व्यक्तीबद्दल काही सांगितलेले नाही. आता या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com