'टल्ली' झाले, मग प्रेम चोप्रांना सुचला 'तो' आयकॉनिक डायलॉग

बॉलीवूडमध्ये (bollywood) जे कोणी व्हिलन (villan) होते त्यात सर्वाधिक लोकप्रिय झालेले व्हिलन म्हणजे प्रेम चोप्रा .
'टल्ली' झाले, मग प्रेम चोप्रांना सुचला 'तो' आयकॉनिक डायलॉग

मुंबई - बॉलीवूडमध्ये (bollywood) जे कोणी व्हिलन (villan) होते त्यात सर्वाधिक लोकप्रिय झालेले व्हिलन म्हणजे प्रेम चोप्रा (prem chopra). त्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. आज प्रेम चोप्रा यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या बॉलीवू़डमधील काही गंमतीशीर आठवणींना उजाळा या लेखाच्या निमित्तानं करण्यात आला आहे. प्रेम चोप्रा हे त्यांच्या हटके स्वभावासाठी प्रख्यात होते. त्यामुळे ते ज्या चित्रपटाच्या सेटवर असत तिथले वातावरण टवटवीत असायचे. प्रेम चोप्रा जेव्हा राज कपूर यांच्या बॉबीमध्ये व्हिलनमध्ये काम करत होते तेव्हाचा त्यांचा टल्ली झालेला किस्सा प्रसिद्ध आहे. त्याविषयी त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.

बॉबीमध्ये (bobby) प्रेम चोप्रा यांनी व्हिलनची भूमिका साकारली होती. प्रेम चोप्रा यांच्या तोंडी जो संवाद होता तो कालांतरानं त्यांची ओळख त्यामुळे बॉलीवूडला झाली. प्रेम चोप्रा नाम है मेरा प्रेम चोप्रा. या संवादानं त्यांना बॉलीवूडमध्ये वेगळी ओळख मिळाली. प्रेम चोप्रा यांचं नाव झालं होतं. मात्र बॉबीमध्ये या संवाद म्हणताना जेव्हा चित्रिकरण सुरु होतं तेव्हा प्रेम चोप्रा यांना काहीही कळत नव्हतं. असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. बॉबी या चित्रपटाची शुटींग सुरु होती. त्या दरम्यान राज कपूर (raj kapoor) यांनी काही वेळ ब्रेक घेतला. त्यावेळी प्रेम चोप्रा यांनी त्यावेळच्या आठवणींनाही एका मुलाखतीच्या दरम्यान उजाळा दिला होता. अनेक गंमती जमती त्यांनी तेव्हा केल्या होत्या. आजही त्या आठवणींना उजाळा देताना ते भारावून जातात.

आपल्याला काही झालं तरी सहाय्यक भूमिका करायच्या नाहीत असा निर्णय प्रेम चोप्रा यांनी बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी घेतला होता. आपल्याला हिरो व्हायचं आहे अशी त्यांची इच्छा होती. मात्र ती काही पूर्ण झाली नाही. त्यामुळे ते व्हिलनच्या भूमिकेत वावरले. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी बॉलीवूडवर अधिराज्य केले. त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. जेव्हा बॉबी चित्रपटात ते व्हिलनची भूमिका करत होते तेव्हा तो संवाद म्हणताना त्यांची उडालेली तारांबळ ते विसरु शकलेले नाहीत. ज्यावेळी त्यांनी राज कपूर यांना तो सीन रिटेक करण्यासाठी विनंती केली. ते सगळे एका पार्टीमध्ये होते. चोप्रा यांना मद्यपान करायला आवडते. तेव्हा त्या बैठकीमध्ये आपल्याला तो आयकॉनिक संवाद सुचल्याचे सांगितलं.

'टल्ली' झाले, मग प्रेम चोप्रांना सुचला 'तो' आयकॉनिक डायलॉग
'फॅमिली मॅन'मुळे समंथा-नाग चैतन्यच्या आयुष्यात घटस्फोटाचं वादळ
'टल्ली' झाले, मग प्रेम चोप्रांना सुचला 'तो' आयकॉनिक डायलॉग
सलमान आणि आयुषचं ‘अंतिम- द फाइनल ट्रुथ’: पोस्टर व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com