प्रियंका चोप्राने बालपणीचे फोटो पोस्ट करत दिला आजीच्या आठवणींना उजाळा... |priyanka chopra grandmother | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

priyanka chopra

प्रियंका चोप्राने बालपणीचे फोटो पोस्ट करत दिला आजीच्या आठवणींना उजाळा...

PRIYANKA CHOPRA GRANDMOTHER : बॉलीवूड(Bollywood)सोबत हॉलीवूड(Hollywood) मध्येही नाव कमावलेली प्रियंका चोप्रा(Priyanka Chopra) कायमच सर्वांना प्रभावित करत असते. तिच्या भूमिका, कसदार अभिनय आणि समाजभान राखून व्यक्त केलेली परखड मते यामुळे तिच्याविषयी चाहत्यांसह बॉलिवूडकरांनाही आदर वाटतो. काही दिवसांपूर्वीच प्रियांकाने आपला पती निक जोनस(Nick Jonas) सोबत अमेरिकेत होळी साजरी केली. हीच प्रियांका आता आजीच्या प्रेमात भावुक झाली आहे. प्रियंकाने आजीसोबतचे लहानपणीचे फोटो शेअर करून आठवणींना उजाळा दिला आहे.

हेही वाचा: मुकेश ऋषी साकारणार अफजलखान, म्हणाले.. शिवाजी महाराज होते म्हणून भारताकडे..

अनेक कलाकार सोशल मीडियावर आपले बालपणीचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. आपण लहानपणी कसे होतो, कसे वागत होतो याविषयी लिहीत असतात. प्रियांका चोप्रानेही असेच काही फोटोसोशल मीडियावर शेअर केले आहे. पण यंदा तिने आपल्या आजीच्या म्हणजे आईच्या आईविषयी लिहिले आहे. आजीचे आयुष्यातील स्थान किती महत्वाचे आहे, या विषयी ती बोलली आहे.

हेही वाचा: हेमांगी कवी फिरवतेय लिंबू... पेट्रोल दरवाढीवर केला उपाय

तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये, प्रियंका, तिची आई मधु चोप्रा, आजी आणि तिची बहीण प्रियम माथूर (priyam mathur) दिसत आहे. हे फोटो तिच्या आजीच्या वाढदिवसाचे आहेत. आजी म्हणजे तिच्या पाठीशी असलेला सर्वात सशक्त ममत्वाचा आधार असल्याचे प्रियंकाने म्हंटले आहे. आज आजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा तिने हे फोटो आणि काही आठवणी शेअर केल्या आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोत ती आजीला घास भरवते आहे. या फोटोला तिने कॅप्शनही मस्त दिले आहे.

प्रियांका म्हणते, ''आम्ही आज माझ्या आजीचा वाढदिवस साजरा करत आहोत. माझे आई आणि वडिल वैद्यकीय क्षेत्रात करिअर करत असताना माझ्या आजीने मला वाढवलं. तिने आमचे कुटुंब सांधले. माझ्या संगोपनात आणि जडघडणीत तिचा मोठा वाटा आहे. मला साथ देणाऱ्या, माझ्यावर माया करणाऱ्या अनेक स्त्रिया माझ्या आयुष्यात आहेत. यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आजी तुझी नेहमी आठवण येते आणि प्रियम माथूर तू नेहमीप्रमाणेच गोड दिसत आहे." असे कॅप्शन प्रियांकाने त्या फोटोंना दिले आहे. काही तासातच लाखो चाहत्यांनी हे फोटो पहिले असून यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Web Title: Priyanka Chopra Says Her Grandmother Raised

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top