निक प्रियंकाचा 'चिअर्स लीडर की गुलाम'?: व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निक प्रियंकाचा 'चिअर्स लीडर की गुलाम'?: व्हिडिओ व्हायरल

निक प्रियंकाचा 'चिअर्स लीडर की गुलाम'?: व्हिडिओ व्हायरल

मुंबई - केवळ बॉलीवूडच नाही तर हॉलीवूडमध्येही आपल्या वेगळेपणानं ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून प्रियंका चोप्राच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. तिनं निक जोन्सबरोबर लग्न केलं. आणि आता ती हॉलीवूडमध्ये काम करते. याशिवाय तिनं आपलं प्रॉ़डक्शन हाऊस तयार केलं आहे. त्याच्या बॅनरखाली वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसीरिज आणि चित्रपट तयार केले आहे. निक जोन्स आणि प्रियंका हे नेहमी चर्चेत असणारं कपल आहे. त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतात. प्रियंकाच्या बर्थ डे ला त्यानं तिच्यासाठी खास वाईन गिफ्ट केली होती. त्याचीही चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती. प्रियंकानं आता एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात तिनं लग्नानंतरचा बदल कसा आहे, याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या निक जोन्स आणि प्रियंका हे दोघेही हॉलीवूड़च्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत. मात्र व्यस्त असूनही हे दोघे सोशल मीडियावर व्यक्त होण्यास विलंब करत नाही. निक आणि प्रियांका हे दोघेही फोटो, व्हिडिओ हे दोघेही सोशल मीडियावर शेयर करत असतात. प्रियांकानं आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल काही गोष्टी शेयर केल्या आहेत. अभिनेत्रीनं पती निक जोन्सच्या बदलाविषयी सांगितलं आहे. जे तिच्या चाहत्यांना आवडलं आहे. चाहत्यांनी तिला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. प्रियंकानं बिनधास्तपणे आपल्या वैवाहिक आयुष्यावर भाष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिला एक प्रश्न विचारण्यात आला होता. तो असा होता की, निकच्या प्रेमातून तुला काय शिकायला मिळालं, त्यावर ती म्हणाली, प्रेम ही एक मोठी गोष्ट आहे. आयुष्यामध्ये प्रेम ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपण त्यावर विश्वास ठेवायला हवा.

प्रेम हा कधीही न संपणारा विषय आहे. तो एक एंड गेम आहे. त्याचा अर्थ तुम्ही केवळ तुमच्या जोडीदारावरच प्रेम करणे असा नाही. तर तुमच्य़ाशी संबंधित असणाऱ्या सर्व व्यक्तींवर प्रेम करणं आपल्याला जमलं पाहिजे. प्रियंकानं जोन्स आपल्याला नेहमीच मदत करतो. त्याला सांगितलेलं काम तो प्रामाणिकपणे करतो. त्याचे आणि माझे बाँडिंग चांगले आहे. आम्ही अनेक कामं वाटून घेतली आहेत. तो माझ्यासाठी एका चिअर्स लीडरच्या भूमिकेत असल्याची प्रतिक्रिया प्रियंकानं यावेळी दिली आहे. तिच्या या प्रतिक्रियेवर चाहत्यांनी वेगवेगळे प्रश्नही विचारले आहेत.

हेही वाचा: Video: सेम टू सेम सिद्धार्थ शुक्ला, चाहते झाले भावूक

हेही वाचा: 'सिद्धार्थ शुक्ला हार्ट अ‍ॅटकनं गेलाच नाही, खरं कारण कळू द्या'

Web Title: Priyanka Chopra Share Nick Jonas Marraige Funny Moments In Interview

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..