सुपरस्टार रजनीकांतला मॅरेज हॉलसाठी लावला 6.5 लाखांचा कर; न्यायालयात घेतली धाव

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 15 October 2020

सतत वेगवेगळ्या कारणांसाठी रजनीकांत हे चर्चेत असतात. आताही त्यांना चैन्नई महानगरपालिकेने भरायला लावलेल्या टॅक्समुळे चर्चेत आले आहे. महापालिकेने त्यांच्या श्रीराघवेंद्र कल्याण मंडपम या मॅरेज हॉलवर 6.5 लाखांचा मालमत्ता कर लावला आहे.

मुंबई - दाक्षिणात्य चित्रपटांचे सुपरस्टार म्हणून ओळख असलेल्या प्रख्यात अभिनेता यांनी चेन्नई महानगरपालिकेच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामागील कारणही तसेच आहे. रजनीकांत यांना ज्यासाठी मोठ्या प्रमाणावर टॅक्स भरायला लावला त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे या नाईलाजाने ग्रेटर चेन्नई महापालिकेच्या मालमत्ता कराच्या मागणीविरोधात याचिका दाखल करावी लागली आहे.

केवळ भारतातच नव्हे तर जगभर रजनीकांत यांचे चाहते आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतूरतेने वाट पाहत असतात. सध्या कोरोनाच्या काळात चित्रपट प्रदर्शनावर काही मर्यादा आल्या आहेत. सतत वेगवेगळ्या कारणांसाठी रजनीकांत हे चर्चेत असतात. आताही त्यांना चैन्नई महानगरपालिकेने भरायला लावलेल्या टॅक्समुळे चर्चेत आले आहे. महापालिकेने त्यांच्या श्रीराघवेंद्र कल्याण मंडपम या मॅरेज हॉलवर 6.5 लाखांचा मालमत्ता कर लावला आहे. याकारणामुळे तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या मालकीच्या असलेल्या मॅरेज हॉलच्या प्रॉपर्टी टॅक्सबाबात मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी ग्रेटर चेन्नई महापालिकेच्या मालमत्ता कराच्या मागणीविरोधात याचिका दाखल केली आहे.

कंगना रनौतला होणार अटक?

रजनीकांत यांनी आपल्याकडे कर भरण्याबद्दल करण्यात आलेली मागणी अयोग्य असल्याचे म्हटले आहे. कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे त्यांचा मॅरेज हॉल 24 मार्चपासून बंद आहे. अशा परिस्थितीत जेव्हा उत्पन्नच झाले नाही तेव्हा कर कशाची मागितला जातोय?, असा प्रश्न रजनीकांत यांनी विचारला आहे. महापालिकेने साडे सहा लाख रुपयांचा मालमत्ता कर लावणे चुकीचे आहे. रजनीकांत यांच्या म्हणण्यानुसार, यासंदर्भात त्यांनी महापालिकेकडे अर्जही केला होता, मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

तुमच्या घरातल्या कुत्र्या मांजरांच्या बातम्या दिल्या तेव्हा चाललं का; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा सवाल

आता हा सुपरस्टार 69 वर्षांचा आहे.  रजनीकांत त्यांच्या चाहत्यांना 'दरबार' या चित्रपटात दिसले होते. त्यानंतर त्यांचा दुसरा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यांचा आगामी चित्रपट 'अन्नाठे' आहे, ज्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर नाही.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajinikanth Withdraws Plea Against above 6 Lakh Property Tax