Video:'ये बिल्लीने मेरा रास्ता क्यों काटा';राखी भर रस्त्यात कोसळली

नवरा रितेशपासून विभक्त झाल्यावर आपण डिप्रेशन मध्ये असल्याचं ती सांगत सुटली आहे.
Rakhi Sawant
Rakhi SawantGoogle

ड्रामाक्वीन राखी सावंतचा(Rakhi Sawant) एक नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर हसायचं की रडायचं हे सुचत नाही. चार-पाच दिवस झालेयत बाईंना पती रितेशपासून विभक्त होऊन. त्यावर रितसर पोस्ट वगैरे करून मॅडमनी जगजाहिर केलं,दुखवट्याच्या मुलाखती वगैरे देऊन झाल्या. पण लगेचच शॉर्ट्स घालून स्टायलीश अंदाजात मॅडम मुंबईच्या रस्त्यांवर फिरतानाही दिसू लागल्या,वर्कआऊटला जाऊ लागल्या. आता हे बरोबर आहे की पोटासाठी बाहेर पडावंच लागणार वगैरे. पण तरिही जी म्हणतेय मी डिप्रेशन मध्ये आहे तिच्यासाठी इतक्या लवकर त्यातनं बाहेर येणं थोडं कठीणच आहे नाही का. पण असो ती राखी सावंत आहे. तिच्यासाठी काहीही शक्य होऊ शकतं. तर आपण बोलत होतो त्या व्हायरल व्हिडीओ संदर्भात.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीन राखीचा हा व्हिडीओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यात राखी तिची जीम जिथे आहे त्या इमारतीमधून बाहेर येत होती. तितक्यात तिच्या समोरुन एक मांजर आडवी गेली. अनं काय मग सुरू झाला राखीचा ड्रामा. ती चक्क आता खाली पडतेय की मग पडतेय या अवतारात रडवेली होऊन म्हणू लागली,''आता मला भीती वाटत आहे. मांजर मला आडवी गेली. आता काय आणखी वाईट होणार आहे माझ्यासोबत''. आणि हे ती चक्क समोर कॅमेरामनना देखील विचारत आहे. त्यातच ती पुढे म्हणते कशी,''मी डिप्रेशन मध्ये आहे. आता मी काय करू....'' यावर नेटिझन्स म्हणालेयत,''मांजर तुला आडवी गेली हे तर त्या मांजरीसाठी धोकादायक''...अशा विनोदी कमेंट्स वाचून पुरती वाट लागली बुवा. आणि काय जो ड्रामा तिनं केलाय तो या बातमीत व्हिडीओ जोडला आहे त्यातनं कळेलच आपल्याला.

Rakhi Sawant
'लाल सिंह चड्ढा' सिनेमा पुन्हा लांबणीवर,प्रदर्शनाची नवीन तारीख आहे...

राखी सावंत नुकतीच तिचा नवरा रितेश पासून विभक्त झाली आहे. तिन पोस्ट करुन ती माहिती दिली आहे. त्यानंतर तिनं एका मुलाखतीत हे देखील स्पष्ट केलं आहे की,''तिचा नवरा सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. त्याची पहिली बायको,मुलगा आहे. त्यानं पहिल्या बायकोला घटस्फोट दिलेला नसल्यानं आता तो माझ्यासोबत राहू शकत नाही. त्यामुळं तो मला सोडून निघून गेला आहे. पण जर त्यानं रितसर पहिल्या बायकोपासून घटस्फोट घेतला आणि त्याला माझ्याकडे यायचे असेल तर मी त्याची वाट पाहत आहे''. तसंच तिनं हे देखील सांगितलं की त्याचा बिझनेसही संपुष्टात आलाय...वगैरे..वगैरे...आता यात किती खरं,किती खोटं देव जाणे. पण आता बाईचं डिप्रेशन तिला आणखी काय काय ड्रामा करायला लावतंय देव जाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com